शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील धक्कादायक घटना! ७० वर्षाच्या महिलेचा खून करुन पावणे दोन लाखांचे दागिने केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 12:41 IST

ओळखीच्यांपैकी कोणीतरी खून केला असावा असा पोलिसांना संशय आहे.

पुणे: सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्र्द येथे एकट्या राहणार्‍या ७० वर्षीय महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने घरातील १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात आले आहेत. हा प्रकार त्यांच्या ओळखीच्यांपैकी कोणीतरी केला असावा असा पोलिसांना संशय आहे.  

शालिनी बबन सोनावणे (वय ७०, रा. सायली अपार्टमेंट, केदारीनगरी, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा विराट बबन सोनवणे (वय ३९) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी सोनवणे या एकट्याच रहात होत्या. त्यांचा मुलगा हा जवळच्या इमारतीत राहतो. काल रात्री तो आईच्या घरी गेल्यावर त्यांना आई हॉलमध्ये पडली असल्याचे दिसून आले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचले. शालिनी यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केला असावा, असा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयाला पाठविला आहे. शालिनी यांचा खून करुन चोरट्याने १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस