शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Sucide In Pune: पुण्यातील धक्कादायक घटना! आई आणि मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:36 IST

आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे

पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.     संगीता दत्तात्रय खपाले (वय ५०), मुलगी रेखा (वय २८, दोघी रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून संगीता या आजारी होत्या. त्यांची देखभाल मुलगी रेखा करायची. संगीता, रेखा आणि त्यांचा मुलगा किरकिटवाडी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत हाेते. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला असून, ती खडकवासला भागात राहायला आहे. संगीता आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. संगीता किरकोळ कामे करून संसार चालवित होत्या. आजारपणामुळे संगीता तसेच त्यांची मुलगी रेखा नैराश्यात होते. आजारपणामुळे संगीता कामही करत नव्हत्या.

मध्यरात्री संगीता आणि रेखा यांनी स्वयंपाकघरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा मध्यरात्री स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेला. तेव्हा आई आणि बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती हवेली पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रेखाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. ‘आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे रेखाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. याप्रकरणी हवेली पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून,  पोलीस उपनिरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाPoliceपोलिसDeathमृत्यूWomenमहिलाHomeसुंदर गृहनियोजन