शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील खळबळजनक घटना! वारकरी संस्था चालकाकडून ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:29 IST

दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अकरा वर्षीय पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी पाठवले होते.

शेलपिंपळगाव : आळंदी परिसरातील एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ (वय २१ रा. सिध्दबेट, केळगाव मुळ रा. वंडागळी ता. सिन्नर जि. नाशिक) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. देवाच्या आळंदीत सातत्याने अशा प्रकारच्या घटना उघड होत असल्याने वारकरी शिक्षणाचे धडे शिकण्यासाठी घरदार सोडून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अकरा वर्षीय पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई वडिलांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. दरम्यान, पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचे त्या मुलाने आईला सांगितले.

संस्थेतील सर्व मुले हरिपाठ करण्यासाठी चालले होते. तेव्हा, पीडित मुलाला भोकनळने तुझ्याकडे काम आहे असे म्हणून थांबवले. सर्व विद्यार्थी हरिपाठाला गेल्यानंतर त्याला एका खोलीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. दरम्यान, पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी देखील शिवप्रसादने दिली. याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AlandiआळंदीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण