शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

धक्कादायक! शेकडो जणांना त्यांनी दिले कोरोनाचे बनावट रिपोर्ट, दोघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 8:20 PM

लोकांच्या जीवाशी केला खेळ

ठळक मुद्देगेल्या ३ वर्षापासून ते पुण्यातील विविध लॅबमध्ये काम करत होते

पुणे: कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणार्‍या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. जंगली महाराज रोडवरील एका वैद्यकीय चाचणी करणार्‍या लॅबच्या नावाने आरोपींनी बनावट रिपोर्ट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोघे गेल्या काही महिन्यापासून कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातून शेकडो जणांना त्यांनी असे बनावट रिपोर्ट दिले आहेत. 

सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी) आणि दयानंद भीमराव खराटे  (वय २१, सध्या रा. वारजे माळवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना अधिक तपासासाठी २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. 

सागर हांडे आणि दयानंद खराटे हे दोघेही लॅब टेक्निशियन आहेत. गेल्या ३ वर्षापासून ते पुण्यातील विविध लॅबमध्ये काम करत होते. हांडे याने जानेवारीमध्ये नोकरी सोडली आहे. खराटे हा अजूनही एका लॅबमध्ये काम करीत आहेत. मात्र, त्या लॅबमध्ये कोविड १९ ची चाचणी केली जात नाही. गेल्या २ -३ वर्षांपासून हे सँपल घेण्यासाठी लोकांच्या घरी जात असल्याने अनेकांकडे त्यांचे नंबर होते. तसेच खराटे हा कोणाच्या घरी सँपल घेण्यासाठी जात, तेव्हा तेथील लोक तुमच्याकडे कोविडची टेस्ट होते का याची चौकशी करीत. तेव्हा खराटे यांना सांगत की आमच्याकडे टेस्ट होत नाही. पण मी मित्राला सांगतो, तो घरी येऊन सँपल घेईल. त्यानुसार सागर हांडे हा सर्व कीट घालून त्यांच्या घरी जात़ सँपल घेत असे.  दोघेही लॅब टेक्निशियन असल्याने त्यांना कोविड रिपोर्टची माहिती होती़ ते दुसर्‍याच्या रिपोर्टमध्ये फेरफार करुन त्यावरील नाव बदलून लोकांना रिपोर्ट देत असत. त्यांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.

जंगली महाराज रोडवरील एका लॅबच्या नावाने यांनी बनावट रिपोर्ट दिले होते. त्यांच्या एका ग्राहकाला त्यांनी निगेटिव्ह रिपोर्ट दिला होता. तरी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने या लॅबला फोन केला. तेव्हा तेथील लॅब व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्याचा तपास करीत असताना डेक्कन पोलिसांनी सागर हांडे आणि दयानंद खराटे यांना शनिवारी अटक केली होती. दोघेही लोकांच्या घरी कीट घालून जात़ सँपल घेत. त्यामुळे लोकांना संशयही येत नव्हता. सँपल घेतल्यानंतर ते तो फेकून देत व बनावट रिपोर्ट तयार करुन लोकांच्या जीवाशी खेळत होते. 

एका कुटुंबातील ८ जणांना दिला निगेटिव्ह रिपोर्ट

या दोघांना अटक केल्याची माहिती मिळाल्यावर वारजे येथील एक जण रविवारी डेक्कन पोलीस ठाण्यात आला. त्याने या दोघांच्या गोरख धंद्यामुळे त्याच्या कुटुंबावर काय संकट कोसळले.  त्यांच्या कुटुंबातील एकाचा महापालिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यावर त्यांचा विश्वास न बसल्याने त्यांनी ओळखीतून या दोघांकडून कोविडची चाचणी करुन घेतली. त्यांनी पहिला रिपोर्ट निगेटिव्ह दिला. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी घरातील ८ - १० जणांची चाचणी करुन घेतली. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी १ हजार रुपये घेतले. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह दिले. त्यामुळे ते खुश झाले. रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने त्यांनी घरात एकमेकांपासून कोणतीही काळजी घेतली नाही. परिणामी एकामुळे सर्वांना कोरोनाची लागण झाली.  दोन तीन दिवसांनंतर सर्वांना त्रास सुरु झाला. त्यांनी सरकारी लॅबमधून चाचणी केल्यावर सर्व जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यांच्या एका रिपोर्टमुळे घरातील सर्व जण पॉझिटिव्ह झाल्याचे ते गृहस्थ सांगत होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या