शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शाळेच्या आवारातच मद्यप्राशन अन् मांसाहारी जेवणाची पार्टी; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:54 IST

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दिवसाढवळ्या तळीरामांचा हैदोस....

राजगुरूनगर : टाकळकरवाडी (ता. खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात तळीरामांनी हैदास घातला होता.शाळा आवारात मद्यप्राशन करत मांसाहारी जेवणाची पार्टी केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबत खेडपोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.

अनुप टाकळकर, निखिल येवले, राजेश पवार, मयुर टाकळकर हे सर्व रा.टाकळकरवाडी (ता खेड ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहे.

शाळा म्हणजे समाजाची प्रतिकृती, शाळा म्हणजे संस्कार केंद्र, शाळा म्हणजे देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी वास्तू अशा या पवित्र ज्ञानमंदिर आवारात या युवकांनी हैदोस घातला होता. टाकळकरवाडी येथील एक नामवंत शाळा म्हणून येथील जिल्हा परिषद शाळेकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जात आहे. या शाळेला १०० वर्ष पूर्ण होत असुन याच शाळेने गावातील अनेक हुशार विद्यार्थी घडविले आहेत.

कोरोनाचा काळ व सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहेत. जिल्हा परिषद शाळा आवारात दिवसाढवळ्या लॉकडाऊनचा दुरुपयोग करीत या परिसरातील या मद्य शौकिनांनी दारूचा अड्डा बनविला होता. रोज भरदुपारी व रात्र झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव दिसत होते. तसेच मांसाहाराची पार्टी करण्यात येते. अन्न शिजविण्यासाठी या शाळा आवारात विटाची चूल या युवकांनी तयार केली होती. या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, प्लॅस्टिक ग्लास ,विविध खाद्यपदार्थाचे रिकामी पाकीट अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.

गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. अतिशय निंदनीय, लज्जास्पद व भयानक वास्तव समोर असताना या गंभीर प्रकाराकडे ना ग्रामपंचायत, ना शालेय समिती, ना मुख्याध्यापक कडून याची दखल घेतली गेली. हम भी चुप, तुम भी चुप अशा प्रकारच्या अवस्था समोर होती.काही ग्रामस्थांनी वेळोवेळी या तरुणांना समज दिली होती.मात्र तरुण कोणाचेही ऐकत नव्हते.

 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSchoolशाळा