शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

धक्कादायक! गुन्हे शाखेच्या पोलिसाची कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मारहाण: बाणेर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 6:22 PM

बाणेरच्या पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार....

पुणे : फोन उचलला नाही, म्हणून महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केली. त्याची तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस चौकीत आलेल्या दोघा डॉक्टर व सुरक्षा रक्षकाला शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत काम करणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍याने आपल्या भावाच्या मदतीने पोलीस चौकीत मारहाण केली.

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय ४०) आणि सागर सिद्धेश्वर गायकवाड (वय ३५, दोघे रा. डी. पी. रोड, औंध) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर गायकवाडला अटक केली आहे. सचिन गायकवाड पळून गेला. याबाबत बाणेर येथील महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधील डॉ. अजयश्री मस्कर यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी हे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे प्रविण जाधव यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सागर गायकवाड याने फिर्यादी यांना फोन केला होता. पण त्यांनी कामात असल्याने तो घेतला नाही. सागर याने त्यांच्या व्हाट्सअपवर मेसेज पाठवून त्यांना शिवीगाळ केली होती. हा प्रकार फिर्यादी यांनी पोलिसांना कळविला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी दीड वाजता सागर हा जाधव यांचा भाचा असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये आला. तेथे त्याने फिर्यादी व तेथील एका कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी दोन मार्शल तेथे आले. त्यांनी दोघांना समजावून पोलीस चौकीत जाऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या सहकारी डॉक्टर व सुरक्षा कर्मचारी हे बाणेर येथील पोलीस चौकीत गेले. तेथे सागर गायकवाड याने पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड व इतर पोलीस मित्रांना बोलावून घेतले. त्या सर्वांना दोघा डॉक्टर व सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण केली. चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक तेथे आल्यानंतर डॉक्टरांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. 

....अन्यथा काम बंद करुयाबाबत डॉ. अजयश्री मस्कर यांनी सांगितले की, येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी नाही. उपचार करणारे डॉक्टर रुग्णांच्या एका नातेवाईकांच्या संपर्कात असतात. ते त्यांना दैनंदिन माहिती देत असतात. मिटिंगमध्ये असल्यामुळे फोन घेता आला नाही. सागर गायकवाड याने व्हॅटसअपवर शिवीगाळ केली होती. याची माहिती पोलिसांना दिली होती. आम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेल्यावर तेथे पोलिसांनाच बोलावून त्याने मारहाण केली. गेली ८ ते ९ महिने आम्ही अहोरात्र काम करत आहोत. राज्यात बाणेरच्या कोविड सेंटरचा मृत्यु दर सर्वात कमी आहे. जर पोलिसांनी मारहाण करणार्‍या संबंधित पोलीस कर्मचार्‍यांना अटक केली नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.

............

हा प्रकार घडल्यानंतर सागर गायकवाड याला तातडीने अटक करण्यात आली असून पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड याचा शोध घेत आहोत

- राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलीस ठाणे.

टॅग्स :BanerबाणेरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसdoctorडॉक्टर