शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांनी १५ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:57 IST

बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्या तिघांनी आपल्या आणखी २ मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

पुणे : बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तिघांनी आपल्या आणखी २ मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच वस्तीत राहणार्या एका १५ वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी ४ महिन्यांपूर्वी सामुहिक अत्याचार केल्याचा प्रकार हवेली पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाला आहे. 

याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात दोन पोस्को अंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल २० डिसेंबर रोजी तळजाई पठार येथे गस्त घालत असताना ईश्वर शिंदे (वय २०) हा संशयितास्पदरित्या फिरताना दिसला. त्याच्याकडील मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लीप मिळाली. त्यात दोघे जण एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे दिसले. शिंदे याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हा व्हिडिओ स्वत: त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून त्यातील दोघे जण व तो मुलगा परिचित असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. शिंदे व त्याचे दोन साथीदार कुणाल भांगरे (वय १९), निलेश नेटके (वय २१, रा़ डोणजे) यांना ताब्यात घेतले. हा प्रकार दिवाळीच्या सुमारास घडला होता. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने सहकारनगर पोलिसांनी आरोपींना हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले.

हवेली पोलिसांनी केलेल्या चौकशीत या तिघांसह इतर दोघांनी एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान डोणजे येथील हॉटेल मधुबन समोरील काम बंद पडलेल्या इमारतीत व मराठी शाळेच्या बंद पडलेल्या बाथरुममध्ये घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी २०२० मध्ये आठवीत शिक्षण घेत होती. यावेळी तिच्या शाळेतील ९ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलांनी तिच्याशी ओळख वाढविली. यातील एकाने तिला मधुबन हॉटेल समोरील बंद पडलेल्या इमारतीत बोलावले. तेथे तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर दोन ते तीन आठवड्यानंतर मराठी शाळेतील बंद पडलेल्या बाथरुममध्ये तिला बोलावून निलेश नेटके व इतर दोघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या प्रकारानंतरही त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांनी संपर्क साधल्यावर या मुलीने फिर्याद दिली असून हवेली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी