शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बंद फ्लॅटमध्ये आढळला ज्येष्ठ दाम्पत्यांचा मृतदेह; पुण्यातल्या शिवाजीनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 10:17 IST

दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नाही...

ठळक मुद्देपोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

पुणे : शिवाजीनगर गावठाण परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये ज्येष्ठ नागरिक पती पत्नीचा मृतदेह आढळून आला. संभाजी बापू शिंदे (वय ७५) आणि शोभा संभाजी शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नाही. शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यु झाली नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे दाम्पत्याला मुळबाळ नव्हते़ दोघेही जण गावठाणातील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर रहात होते. त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला येऊन जात होते. कधी त्यांच्याशी फोनवरुन संपर्कात होते. मात्र, मागील ८ दिवसात त्यांचा फोन लागत नव्हता़ त्यामुळे शोभा शिंदे यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आज आली होती.पंरतु अनेकदा दरवाजा वाजविल्यानंतरही त्यांनी दरवाजा उघडला नाही. तेव्हा शेजारच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर दोघेही मृतावस्थेत आढळून आले.त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयाला पाठविले आहे.शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्युचे कारण समजू शकणार आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस