शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! पुणे शहरात प्रतिदिन जमा होतो ४ टन जैव वैद्यकीय कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 09:00 IST

जैव वैद्यकीय कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरू शकते...

ठळक मुद्देजैव वैद्यकीय कच-यामध्ये वापरलेली इंजेक्शन्स,कापसाचे बोळे, बँडेजेस, रक्त, औषधे यांचा समावेश

पुणे : महापालिकेकडे नोंदणी असलेली विविध रूग्णालये, दवाखाने, रक्त पेढया पॅथॉलॉजिक लॅब यांच्याकडून प्रतिदिन ३ ते ४ मेट्रिक टन इतका जैव वैद्यकीय कचरा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे जमा होत असून, त्यातील 1.20 टन कच-यावर पुनप्रक्रिया क्रिया केली जात आहे. मात्र, अद्यापही अनेक दवाखान्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. रोजच्या वापरातून उरलेल्या निरूपयोगी वस्तूंचा साठा म्हणजे घनकचरा. सध्याच्या काळात ई-कचरा प्रमाणेच जैव वैद्यकीय कचरा महत्वपूर्ण मानला जातो. या कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरू शकते. या जैव वैद्यकीय कच-यामध्ये वापरलेली इंजेक्शन्स, मलमपट्टी केलेले कापसाचे बोळे, शस्त्रक्रिया करून काढलेले भाग, बँडेजेस, रक्त, थुंकी, लघवीचे नमुने, औषधे यांचा समावेश होतो. या कच-यामध्ये अनेक प्रकारचे रोगजंतू, विषाणू असतात. त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलीत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून, पास्को एनव्हायर्मेंटल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला काम देण्यात आले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी  ‘लोकमत’शी बोलताना दिली.महापालिकेकडे  जवळपास 750 रूग्णालये , 3500 क्लिनिक, 17 ब्लड बँक, 315 पँथलँब यांची नोंदणी आहे. त्यांच्याकडून जैव वैद्यकीय कचरा पिवळ्या ( ज्वलनभट्टीत जाणारा कचरा), लाल ( थ्रेडिंग, रिसायकलिंग व डंपिंगला जाणारा कचरा), व पांढरा (धारदार, काचेचा कचरा) पिशव्यांमध्ये गोळा करण्यात येतो. इंसिनरेशन प्रक्रियेमध्ये 1800 डिग्री सेंटीग्रेडला ज्वलनभट्टीमध्ये विषारी जीवाणू व जंतुसंसर्ग नष्ट करण्यासाठी हा कचरा जाळला जातो. नायडू रूग्णालयाच्या जवळील कैलास स्मशानभूमी परिसरात जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावली जाते. प्रतिदिन 3800 ते 4000 किलो कचरा गोळा केला जातो. हा कचरा संकलित करण्यासाठी 7 जीपीएस यंत्रणायुक्त वाहनांची सोय करण्यात आली आहे. नोंदणीकृत रूग्णालय दवाखाने, रक्त पेढया,पॅथॉलॉजिकल लॅब यांच्याकडूनच हा वैद्यकीय कचरा उचलला जातो. अद्यापही अनेक दवाखान्यांची महापालिकेकडे  नोंदणी झालेली नसल्याचे आरोग्य विभागाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न