शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:24 IST

शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्या, पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील घटना

मंचर: कळंब (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी वस्तीवर शुभांगी भालेराव ही तरुणी वीजपंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली होती. ती बराच वेळ घरी परतली नाही.शेजाऱ्यांनी तिला विहिरीकडे जाताना पाहिले होते.याबाबतची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी शोधाशोध केली.त्यावेळी विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला. शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्याने बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

शुभांगी संजय भालेराव (वय १९) या तरुणीचा आज सोमवारी बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, तरुणीच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर खरे कारण समोर येणार आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी भालेराव ही तरुणी वीजपंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली होती. ती बराच वेळ घरी परतली नाही.शेजाऱ्यांनी तिला विहिरीकडे जाताना पाहिले होते.याबाबतची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी शोधाशोध केली.त्यावेळी विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला.शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्याने बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.सदर घटनेचा तपास मंचर वनविभाग अधिकारी करीत आहेत.शुभांगी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून शुभांगी संजय भालेराव या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तर वनखात्याने तपासानंतर मृत्यूचे मूळ कारण पुढे येईल असे सांगितले आहे.

घटनास्थळी मंचर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच कळंब येथील माजी सभापती वसंतराव भालेराव,भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे ,उपसरपंच डॉ. सचिन भालेराव,उद्योजक नितीन भालेराव  यांच्यासह वाडीवस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे म्हणाले शुभांगी भालेराव हीचा मृत्यु बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.या भागात बिबट्याचा वावर असतो.या तरुणीच्या चेहर्‍यावर,कानावर जखमा आहे. मात्र त्या जखमा खोलवर नाही. ती वीज पंप सुरू करण्यासाठी विहिरीवर गेली होती. यामुळे तिचा मृत्यू विहिरीत पडून झाला,विजेचा धक्का बसून झाला अथवा बिबट्याच्या हल्ल्यात  झाला याची ठोस माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढे येईल.तसेच तपासानंतर शुभांगी भालेराव हिच्या मृत्यूचे मूळ कारण समोर येणार आहे.

याबाबत माहिती देताना वनपाल नारायण आरूडे म्हणाले, ही तरुणी विहिरीत पडली होती.तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात पोलिस तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल व पोलिसांचा तपासातील निष्कर्ष पुढे आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

टॅग्स :MancharमंचरDeathमृत्यूleopardबिबट्याforestजंगलPoliceपोलिस