शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 17:37 IST

मी माझ्या शालेय जीवनात कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न मला पडायचा.

पुणे : १९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं. बाळासाहेबांच्या शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळी सुद्धा हजर होते. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, तू बोलणार आहेस ना. मी म्हटलं, तू काहीतरी बोलू नकोस हा…. नाही तर मी येथून निघून जाईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे. हे सर्व आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू.. अशाप्रकारे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला. 

मनसे प्रमुख राज ठाकरे हे शनिवारी (दि. ४) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेच्या वतीने आयोजित ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. 

राज ठाकरे म्हणाले, इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता. 

आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकले सुद्धा आहेत.,मात्र  हे लहानपणापासून जरी अनेक दिग्ग्ज वक्त्यांना मी पाहत आलो असलो तरी आयुष्यात कधी बोलेल, असं कधीच वाटलं नव्हतं असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात. त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, असेही ते म्हणाले. 

याचवेळी.दुपारचे दोन वाजले आहेत. सकाळपासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात बहुदा वक्तृत्व वक्तृत्व असे आवाज येत असतील अशा शब्दात ठाकरे यांनी मिश्किल टिपण्णी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे