शिवसेना चिंचवड विभागप्रमुखाची हत्या

By Admin | Updated: October 19, 2014 01:40 IST2014-10-19T01:40:13+5:302014-10-19T01:40:13+5:30

शहरातील पुनावळे येथे शिवसेनेचे चिंचवड विभागप्रमुख राजू दर्शिले यांची चार गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.

Shivsena Chinchwad's head of the department murdered | शिवसेना चिंचवड विभागप्रमुखाची हत्या

शिवसेना चिंचवड विभागप्रमुखाची हत्या

पिंपरी-चिंचवड (जि़ पुणो) : शहरातील पुनावळे येथे शिवसेनेचे चिंचवड विभागप्रमुख राजू दर्शिले यांची चार गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. पुनावळे-जांभे रस्त्यावरील दर्शिले यांच्या कार्यालयात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सराईत गुन्हेगार सचिन कुडले याचे नाव हल्लेखोर म्हणून पोलीस तपासात पुढे आले आहे. विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास उरले असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे शिवसैनिकांत खळबळ उडाली. हल्लेखोर व हल्ल्यामागील कारणांचा पोलीस तपास घेत आहेत.
राजू दर्शिले यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. रात्री साडेआठच्या सुमारास जमीन खरेदीच्या बहाण्याने हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात आले आणि गोळीबार करून पसार झाले.  हा प्रकार इतक्या वेगाने घडला की कार्यालयाबाहेर असणा:यांना ही घटना समजायला काही मिनिटांचा अवधी लागला. यानंतर एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेतील दर्शिले यांना थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे पुनावळे व  रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Shivsena Chinchwad's head of the department murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.