शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा इतिहास पुन्हा जिवंत होणार; रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ सृष्टी साकारली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:50 IST

प्राधिकरणाचा आराखडा : ८८ एकरांमध्ये प्रकल्प; ६०६ कोटींच्या निधीला मंजुरी

- नितीन शिंदे पिंपरी-चिंचवड : देशातील सर्व गड-किल्ल्यांसाठी रोल मॉडेल रायगडच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन व विकासासाठी सुमारे ६०६ कोटींच्या आराखड्याला राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामध्ये रायगडच्या पायथ्याला असलेल्या पाचाड येथील दुर्लक्षित जिजाऊ वाड्याच्या परिसरातील ८८ एकरांत ‘जिजाऊ सृष्टी’ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ला रायगडावर झाला. त्यामुळे रायगडाला देशाच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. रायगडाच्या ऐतिहासिक वास्तूच्या विकासाचे मॉडेल बनवून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास देशातील व परदेशातील पर्यटकांना माहिती करून देण्यात येणार आहे. त्या उद्देशाने रायगड प्राधिकरणाची स्थापना राज्य शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजी केली. इंग्रज व मराठ्यांच्या युद्धात १८१८ मध्ये तोफांच्या माऱ्यामुळे रायगडावरील वास्तूचे नुकसान झाले. सभासद बखरीमध्ये रायगडावर ३५० वास्तू असल्याचा उल्लेख आहे. त्यातील अनेक मौल्यवान वास्तू व शस्त्रे जमिनीत गाडल्या गेली आहेत. त्यामुळे पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील पुरातन वास्तू तज्ज्ञांच्या सहाय्याने गडावर शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन सुरू आहे. पायथ्याला असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याचे संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या पुरातन वास्तू व ऐतिहासिक शस्त्रांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.मराठ्यांच्या इतिहासाची व गडकोटांची माहिती देणारे भव्य पुस्तकालय, पर्यटन माहिती केंद्र, जिजाऊंची महती देणारी सृष्टी, मावळ्यांची शौर्य व इतिहासाचे माहिती केंद्र, शिवकालीन ऐतिहासिक धाटणीचे व मराठा स्थापत्यशैलीतून जिजाऊ सृष्टी साकारण्यात येणार आहे. पर्यटकांना रायगडावर जाण्याचा मार्ग करण्यात येणार आहे, असे संभाजीराजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नवीन १६६ (एफ)महामार्गरायगडाकडे येणारे सर्व रस्ते महाड येथे एकत्र येतात. त्यामुळे महाड ते रायगड मार्गास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तसेच, या मार्गाला १६६ एफ नावाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे. या महामार्गामुळे रायगड संवर्धन, पर्यटन, महसूल वाढ आणि स्थानिकांसाठी नव्याने रोजगारनिर्मिती होणार आहे.नाने दरवाजा पुन्हा उभा पूर्व स्थितीत असलेला अर्धा भाग जसा आहे त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून पडका भाग उभा करण्यात येणार आहे. त्यामधील सैनिकी वास्तुशैली शिवभक्तांना अनुभवता येणार आहे. चित्त दरवाजा मार्गावर असणारा खुब लढा बुरुज याचेही जतन, संवर्धन सुरू करण्यात येत आहे. मशीद मोर्चाच्या भागात अनेक जुन्या वास्तू होत्या. त्यांचेही जतन, संवर्धन होणार आहे, अशी माहिती वास्तुसंवर्धक (काँजर्व्हेशन आर्किटेक्ट) वरुण भामरे यांनी दिली.महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान या राज्यातही गडकोटांची संख्या जास्त आहे. पर्यटन व्यवसाय हा राजस्थानच्या महसुलाचा कणा आहे. राजस्थानातील गडकोटांच्या संवर्धनामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित झाले आहेत. त्याच धर्तीवर रायगड जतन व संवर्धन करण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती जागतिक पातळीवर नेऊन परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे.- खासदार संभाजीराजे छत्रपती,अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरणस्थानिकांना रोजगारपाचाड येथील जिजाऊंच्या वाड्यांभोवती (घेरा रायगड) म्हणजे किल्ल्याच्या परिसरातील २१ गावांचा विकास प्राधिकरणातर्फे करण्यात येणार आहे. या गावांत रस्ते, पाणी, वीज व आरोग्याच्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. रायगडाच्या पर्यटन विकासामुळे परिसरातील गावांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPuneपुणेRaigadरायगड