शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
2
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
3
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
4
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
5
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
6
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
7
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
8
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
9
छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
10
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
11
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
12
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
13
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
14
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
15
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
16
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
17
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
18
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
19
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
20
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू

लाडकी बहीण योजनेच्या यशामागे शिवराजसिंह चौहान, अजित पवार थेटच बोलले...

By नितीन चौधरी | Updated: June 3, 2025 19:28 IST

या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले.

पुणे : मध्य प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या ‘लाडली बहन’ योजनेने आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच वाटेवरून आम्ही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. ही आजवरचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आम्ही चौहान यांचे आभारी आहोत, अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुण्यात आयोजित पहिल्या ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘या योजनेमुळे महिलांनी भरभरून प्रेम दिले. आमच्या मतपेट्या मतांनी भरभरून वाहिल्या. परिणामी, विधानसभेच्या २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय आहे. राज्यात महायुतीचे एक बळकट सरकार स्थापन झाले आहे.’

शिवराजसिंह चौहान यांचे विशेष आभार मानत, त्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला मतदारांची मने जिंकण्याचा मार्ग दाखवला. आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ही योजना राबवली आणि त्यातून मतदारांचा विश्वास मिळविला. त्यामुळेच हे यश शक्य झाले. आम्हाला विजयाचा मार्ग दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो,’ अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

चौहान म्हणाले, ‘ही योजना माझी नाही, ती तुमचीच आहे. याबाबत मी राज्य सरकारला धन्यवाद देईन. त्यांनी गरीब बहिणींचे दु:ख समजून घेतले. हजार दोन हजारांसाठी त्यांना अडचणी येत होत्या. या योजनेतून त्यांना मदत करण्यात आली. मध्य प्रदेशात लाडकी लक्ष्मीपासून लाडकी बहीणपर्यंतचा प्रवास महिला सशक्तीकरणाचा आहे. मात्र, महाराष्ट्राने केलेल्या अनेक कामांचा अवलंब अन्य राज्ये करत आहेत. दुसऱ्यांकडील एखादे काम चांगले असल्यास महाराष्ट्रात अवलंब केला जातो.’

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान