शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:47 IST

याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून शिवधर्म संघटनेच्या सात कार्यकर्त्याना अटक केली आहे.

इंदापूर : भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातील गुंड म्हणणाऱ्या इंदापूर मधील अशोक जिंदाल नावाच्या व्यावसायिकाला शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळं फासत तसेच त्यांची धिंड काढत पोलिस ठाण्यात आणलं होतं. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी आता कडक कारवाई करत सात कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 

याप्रकरणी उद्योजक अशोक जिंदाल यांना इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांवर तोंडाला मास्क न लावणे, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण, महाराष्ट्र पोलीस कायदा उल्लंघन,आपत्ती व्यवस्थापन कायदा,भारतीय साथरोग कायदा, व जिल्हाधीकारी यांचे आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या ७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. यात दीपक उर्फ सिताराम काटे (वय २८ रा.इंदापूर), अमोल अंकुश पवार ( वय २५ रा. अकलूज), कुणाल शिवाजी चव्हाण (वय ३३, रा. अकलूज जि. सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय २४ रा.अकलूज), किरण रवींद्र साळुंखे (वय २७ रा. भवानीनगर ता. इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय २५ रा. बारामती), सुनील विठ्ठल वायकर (वय ३३, रा. अकलूज) अशी नावे आहेेेत. शुक्रवारी ( दि. २५) आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता आरोपींची १५ हजार रूपये जात मुचलक्याच्या जामिनावर सुटका केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.

इंदापूर येथे व्यावसायिक अशोक जिंदाल यांची गाडी अडवत त्यांच्या तोंडाला काळं फासत त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढण्याची घटना घडली होती. तसेच उदयनराजे यांच्याविषयी अपशब्‍द वापरणाऱ्या जिंदाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकारानंतर शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण पसरले होते.

काय आहे नेमकं प्रकरण इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एमआयडीसीत एका खासगी कंपनीचे कंपनीचे अशोक जिंदाल हे मालक आहेत.जिंदाल यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्‍द वापरल्‍याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात जिंदाल यांनी उदयनराजे यांचा साताऱ्यातील एक गुंड असा उल्लेख केला होता. याचवरुन गुरुवारी (दि.२५ ) सायंकाळी इंदापूर शहरात जिंदाल यांची गाडी अडवत शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासत, त्यांची धिंड काढत त्यांना पोलिस ठाण्यात आणलं होतं.

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेCrime Newsगुन्हेगारीbusinessव्यवसाय