शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'शिवडे आय एम सॉरी'ने खळबळ, राजकीय वरदहस्तामुळे कारवाईला मिळेना बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 22:31 IST

पिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी...’ अशी फलकबाजी करून प्रियसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांनी सापडला आहे. याबाबत फलक अधिकृत की अनधिकृत हे तपासण्यासाठी

पिंपरी : पिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी...’ अशी फलकबाजी करून प्रियसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांनी सापडला आहे. याबाबत फलक अधिकृत की अनधिकृत हे तपासण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे प्रियकर आणि त्याच्या साथीदारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

पिंपळे सौदागर, वाकड परिसरात उच्चभ्रू वसाहतींची संख्या अधिक आहे. संगणक अभियंते या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर  ‘शिवडे आय एम सॉरी’ असा मजकूर असलेले फलक लावले असल्याने शहरात खळबळ उडाली होती. शुक्रवारी पहाटे या परिसरात दहा ते पंधरा मोठे आणि की आॅक्स आकारातील सुमारे तीनशेहून अधिक फलक लावले होते. सुरुवातीला हे फलक कोणी लावले याची माहिती मिळत नव्हती. सोशल मीडियावरून याचा बोभाटा झाल्याने पोलीस यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी शोध घेतला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर सुरुवातीला ही एका लघुपटाची जाहिरात आहे, असे सांगितले. त्यानंतर जागा मालकांशी पोलिसांनी संपर्क साधला़ त्या वेळी हे फलक कोणी लावले हे समजले़ त्यानंतर पोलिसांनी सायंकाळी आदित्य विकास शिंदे (वय २५, रा. केशवनगर चिंचवड) व त्याचा मित्र नीलेश संजय खेडेकर (वय २५, रा. घोरपडी पेठ, पुणे) यांना ताब्यात घेतले. चौकशी केली त्या वेळी प्रियसीकडे माफी मागण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली. मात्र, अनधिकृत फलकबाबत कारवाई किंवा तक्रार दाखल करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने पोलिसांनी महापालिकेला कळविले आहे.दरम्यान याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागास संपर्क साधला असता कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, शनिवारी दिवसभर सहायक आयुक्त विजय खोराटे यांना वारंवार दूरध्वनी केला असता त्यांनी फोन उचलला नाही. 

राजकीय वरदहस्ताने कारवाई नाहीच

प्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी एका तरुणाने सुमारे तीनशे फलक ठिकठिकाणी उभारले. कल्पतरू चौक ते पिंपळे सौदागर या परिसरात होर्डिंगवर व रस्त्यावरील विद्युत खांबांवर हे फलक उभारले होते. एका तरुणाची त्याच्या प्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी फलक उभारले आहेत. दरम्यान यातील तरुण हे राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासन प्रेमवीरांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस