शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:37 IST

महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का?

नारायणगाव : अवघ्या हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे ते यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे सर्व शिव-शंभू भक्तांचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याकामी पुढाकार घेणार का ? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज नाही, याकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’ अशी घोषणा करीत तमाम शिव-शंभू भक्तांच्या भावनाच खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून खासदार डॉ. कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी १०० फुटी भगवा ध्वज लावावा, अशी मागणी करीत आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांकडे त्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत आहेत. मात्र पुरातत्व विभाग नियमांवर बोट ठेवून परवानगी देण्याचे टाळत आहे. पुरातत्व विभागाच्या या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना ‘जर केंद्र सरकार ३७० कलम हटवू शकते तर, ब्रिटिशकाळात अस्तित्वात आलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या कायद्यात, नियमात का बदल करू शकत नाही,’ असा जळजळीत सवाल केंद्र सरकारला विचारला होता.

केवळ संसदेत आवाज उठवून न थांबता शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्याची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का? हे पाहावे लागेल. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याविषयी पुढाकार घेणार का ? याकडेही शिव-शंभू भक्तांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीAmit Shahअमित शाह