शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरचा गड शिवसेनेने केला काबीज

By admin | Updated: February 24, 2017 02:21 IST

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या बहुरंगी निवडणुकीत

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या बहुरंगी निवडणुकीत शिवसेनेने अनपेक्षितपणे मुसंडी मारून जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समितीत बहुमत मिळवून ६ जागा जिंकून भगवा फडकावला आहे. तर, काँग्रेसने बेलसर-माळशिरस गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा जिंकल्या आहेत. येथे विमानतळाचा मुद्दा चांगलाच गाजला असून, याच मुद्द्यावर शिवसेनेला येथे फटका बसला आहे. पुरंदर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शिवसेनेची सलगी त्यांना चांगलीच भोवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पार सफाया झाला असून त्यांना, मनसेला व भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. आज सकाळी १० वाजता दिवे येथील शासकीय तंत्रशिक्षण संस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली. संपूर्ण मतमोजणीचे २० फेऱ्यांत नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या ४ जागांपैकी ३ जागांवर काँग्रेस आघाडीवर होती, तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर होती. सहाव्या फेरीलाही अशीच स्थिती होती. पंचायत समिती गणातही काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, सेना एक आणि मनसे एका जागेवर आघाडी घेऊन होती. ही परिस्थिती १०व्या फेरीपर्यंत होती. ११व्या फेरीपासून मात्र चित्र बदलत गेले. जिल्हा परिषदेच्या चारपैकी दोन जागांवर शिवसेना व प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस आणि मनसे आघाडीवर होते. पंचायत समितीत काँग्रेस ४ जागांवर व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी २ जागांवर आघाडीवर राहिले होते. तेराव्या फेरीपासून शिवसेनेने मुसंडी मारली ती अंतिम निकाल हाती आला तेव्हा जिल्हा परिषदेच्या चारपैकी ३ जागा आणि पंचायत समितीच्या ६ जागा जिंकून पुरंदरवर पहिल्यांदाच सेनेने अधिकृत भगवा फडकावला. यात काँग्रेसने मात्र बेलसर-माळशिरस गट राखला. या गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांचे गेल्या वीस वर्षांपासून वर्चस्व होते. काँग्रेसचे युवा नेते दत्ता झुरंगे यांनी त्यांचा तब्बल २,२१० मतांनी पराभव केला. या गटातील जिल्हा परिषदेची व पंचायत समितीच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत दत्ता झुरंगे हे ‘जायंट किलर’ ठरले. या गटातील पंचायत समितीच्या बेलसर गणात कॉँग्रेसच्या सुनीता बाळासाहेब कोलते यांनी सेनेच्या अश्विनी धीरज जगताप यांचा ६९४ मतांनी पराभव केला, तर माळशिरस गणात काँग्रेसच्याच सोनाली कुलदीप यादव यांनी राष्ट्रवादीच्या मनीषा अरुण यादव यांचा अवघ्या ४३ मतांनी पराभव करून विजयी झाल्या.हीच परिस्थिती दिवे-गराडे गटातही झाली. या गटावर पूर्वी जनता दल आणि आता मनसेचे गेली चाळीस वर्षे वर्चस्व होते. मनसेचा हा गड सेनेचे जिल्हा परिषदेचे ज्योती राजाराम झेंडे यांनी मनसेच्या स्वाती नीलेश जगदाळे यांचा तब्बल ४,०१९ मतांनी पराभव करून खेचून आणला. तर, याच गटातील दिवे गणातील जागा ही सेनेच रमेश एकनाथ जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊसाहेब झेंडे यांचा १,९०८ मतांनी पराभव करून विजय मिळविला. गराडे गणातही सेनेचे दत्तात्रय शंकर काळे हे मनसेचे दत्तात्रय सोपान शेंडकर यांचा ९६ मतांनी पराभव करून विजयी झाले.काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या वीर-भिवडी गटातही सेनेने जोरदार मुसंडी मारून हा गट खेचून आणला आहे. सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव यांनी काँग्रेसचे पिनूशेठ बबनराव काकडे यांचा १,४२४ मतांनी पराभव केला. या गटातील दोन्ही गण शिवसेनेनेच जिंकले असून, भिवडी गटात सेनेच्या नलिनी हरिभाऊ लोळे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या शैला विठ्ठल मोकाशी यांचा ७७६ मतांनी पराभव केला. वीर गणातही सेनेच्याच अर्चना जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी कॉँग्रेसच्या मीनल भारत धुमाळ यांचा १,९०५ मतांनी पराभव केला. तर, नीरा-शिवतक्रार गणात गोरखनाथ बाबूराव माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देविदास मधुकर भोसले यांचा ६४ मतांनी पराभव केला. या गटात राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या सुजाता दगडे यांनी बंडखोरी केली होती. त्यांना २,५३३ मते मिळाल्याने राष्ट्रवादीला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. या निवडणुकीत खरी लढत ही काँग्रेस व शिवसेनेतच झाली.राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. तर, चारही गटांत तब्बल १,४८९ मतदारांनी, तर आठही गणांत १,३८९ मतदारांनी नोटा वापरून उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. चारही गटांसाठी एकूण मते १,१४,१९७ मते मोजण्यात आली. यांतील ७५ मते अवैध ठरली. आठही गणांत ५७ मते बाद होती. कोळविहिरे-नीरा शिवतक्रार गट हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला मानला जातो. हा संपूर्ण गट दोन्ही गणांसह शिवसेनेने खेचून आणला आहे. या गटात सेनेच्या शालिनी शिवाजी पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तेजश्री विराज काकडे यांचा ७७४ मतांनी पराभव केला. याच गटातील कोळविहिरे गणातही शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अतुल रमेश म्हस्के यांनी खैरे यांचा ८७५ मतांनी पराभव केला.