शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात कराल तर याद राखा; पुणे महापालिकेविरोधात शिवसेनेची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 12:26 IST

शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या आवारात पाणीकपातीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रशासानाच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.

ठळक मुद्देशिवसेनेने आक्रमक धोरण घेत प्रशासनाचा निषेध म्हणून महापालिकेत केले आंदोलन प्रशासनाचा हा आदेश पुण्यावर अन्याय करणारा : संजय भोसले

पुणे: शहराच्या पाण्यात कपात कराल तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेनेच्या वतीने संभाव्य पाणीकपातीच्या विरोधात देण्यात आला. महापालिकेच्या आवारात या कपातीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रशासानाच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.एका स्थानिक शेतकर्‍याच्या तक्रारीच्या सुनावणीत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाण्यात साडेसहा टीएमसी कपात करावी असा आदेश दिला. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक धोरण घेत प्रशासनाचा निषेध म्हणून महापालिकेत आंदोलन केले. महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बरोबर पाण्याचे हंडे आणले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, या प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा लिहिलेले फलक शिवसैनिकांनी हातात धरले होते. त्याच घोषणाही देण्यात येत होत्या. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले की प्रशासनाचा हा आदेश पुण्यावर अन्याय करणारा आहे, तसेच तो जाणीवपूर्वक काढलेला आहे. प्रशासनच आग्रही असलेल्या २४ तास पाणी योजनेची फेरनिविदा जाहीर होणे व त्याच वेळी हा आदेश काढला जाणे यात सुसूत्रता दिसते. पाण्याची गरज निर्माण करून योजना माथी मारायची असा विचार दिसतो आहे. शिवसेना हे होऊ देणार नाही. राज्य सरकारने वाढवून दिलेला पाण्याचा कोटाच मुळात कमी पडतो आहे. पुणेकरांना वेठीस धरण्याचा शिवसेना प्रतिकार करेल.आंदोलनात पुणेकरांच्या पाण्यात तब्बल ६.५० टीएमसी कपात करण्याच्या जलसंपदा विभागातील प्रशासनाच्या आदेशाविरोधात शिवसेनेच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पुण्यात पाणीकपात कराल तर याद राखा शिवसेनेशी गाठ आहे. प्रशासनाला शिवसेना पाणी दाखवून देईल असा इशाराही देण्यात आला.   भोसले यांच्यासह नगरसेवक नाना भानगिरे, विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, श्वेता चव्हाण, महिला आघाडीच्या निर्मला केंद्रे, राधिका हरिश्चंद्रे , सुदर्शना त्रिगुणाईत, गीता वर्मा, सविता निकाळजे, सुहासिनी जावळे, रोशन शेख, शाकिरा पठाण, ऊर्मिला नामदास, सुनीता शिंदे, दीपा पाटील, मीना पाटील, रेखा साठे, प्रीती जाधव, प्रगती ठाकूर, किरण साळी आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीagitationआंदोलन