शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेचा स्वबळाचाच निर्धार, सर्वच मतदारसंघांचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 01:04 IST

विधानसभा मतदारसंघनिहाय काही जणांना तयार राहण्यास सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुणे : ‘भारतीय जनता पार्टीची फिकीर करू नका, आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली गरज आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा’ असा आदेश पक्ष नेतृत्वाने दिल्यामुळे शिवसेनेने विधानसभेची तयारी करण्यास पुण्यातून सुरुवात केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय काही जणांना तयार राहण्यास सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुण्यात २१ जुलै रोजी दौरा झाला होता. त्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांचा आढावा घेतला. भाजपाबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यात काळजी व्यक्त केली. आपलाच हात धरून मोठे झाले व आता आपल्यालाच बाजूला सरकवत आहे अशीच बहुसंख्य शिवसैनिकांची भावना होती. त्याची दखल घेत ठाकरे यांनी भाजपाची काळजी करण्याचे कारण नाही, त्यांचे वर्चस्व असेल तर ते आपल्यामुळे मोडीत निघणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करा, असा आदेशच पदाधिकाºयांना दिल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.पुण्यातील आठही मतदारसंघांत त्यांचेच आमदार आहेत. त्यांचे वर्चस्व त्यांना अबाधित ठेवायचे असेल तर आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली गरज आहे, असे मत ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केले. त्यामुळे तुम्ही अगदी आतापासूनच मतदारसंघ बांधायला सुरुवात करा, पकड पक्की करा, युती होणार नाहीच पण झाली तरी आपली ताकद त्यांना दिसायलाच हवी, ती असेल तर त्यांना झटकून टाकणे फार अवघड नाही असा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी पदाधिकाºयांना उत्साहित केले. त्याचाच परिणाम म्हणून आता पुण्यातील शिवसेनेने आक्रमक धोरण घेत भाजपावर थेट टीका करणे सुरू केले आहे. या बैठकीत काही जणांनी अचानक निर्णय झाला तर तयारीला वेळ मिळत नाही, असा सूर लावला. त्याचीही ठाकरे यांनी दखल घेतली व त्यामुळेच तुम्ही आतापसूनच तयारीला लागा असे सांगितले. काही जणांची नावेही त्यांनी त्याच बैठकीत निश्चित करून दिल्याची चर्चा आहे. हेच उमेदवार असतील असे नाही, मात्र त्यांनी त्यादृष्टीने मतदारसंघात कामे सुरू करावीत असे आदेश त्यांनी संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून त्यांना दिल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत बाहेरून येणाºयांना लगेचच उमेदवारी दिली जात नाही. पक्षाचे काम करणाºया निष्ठावान शिवसैनिकांना डावलले जाणार नाही, तसेच उगीचच जुने आहेत म्हणून लगेचच उमेदवारीही दिली जाणार नाही, असे ठाकरे यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले.पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला २१ लाख मते मिळाली. राष्ट्रवादीला १२ लाख तर शिवसेनेला तिसºया क्रमांकांची म्हणजे ८ लाख ५० हजार मते मिळाली आहेत. काँग्रेस थेट चौथ्या क्रमाकांवर होती. त्यांना ६ लाख ५० हजार मते मिळाली होती. चार सदस्यांचा एक प्रभाग होता. त्यामुळे या मतसंख्येला चारने भागले तर शिवसेनेची साधारण २ लाख ते सव्वादोन लाख मते पुणे शहरात पक्की असल्याचे दिसते आहे. प्रयत्न केला तर यात चांगली वाढ होऊ शकते, असे पक्षनेतृत्वाने संभाव्य उमेदवारांच्या मनावर ठसवले आहे.>डॉ. नीलम गोºहे लोकसभेच्या उमेदवार?लोकसभाही स्वबळावरच लढवायची अशीच चर्चा त्या बैठकीत झाली. माजी शहरप्रमुख विनायक निम्हण यांची त्याच वेळी काँग्रेस प्रवेशाची बोलणी सुरू होती. मात्र हा प्रवेश लांबणीवर पडला आहे. मात्र निम्हण पक्षात सक्रिय नसल्याने त्यांच्याऐवजी विधानपरिषदेच्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांच्या नावाची लोकसभेच्या उमेदवार म्हणून चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे पालिकेतील गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे, रमेश कोंडे,माजी आमदार चंद्रकात मोकाटे, महादेवबाबर यांना पुण्यातून तयारी करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळेचत्यांच्यातील काहींनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका, कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे.फ्लेक्सच्या माध्यमातूनही त्यांनी मतदारसंघात मिरवणे सुरू केल्याचे चित्र दिसते आहे.

 

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हे