शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:31 PM2021-08-24T17:31:24+5:302021-08-24T17:48:51+5:30

शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा म्हणून निवेदनही देण्यात आले

In Shirur, Shiv Sainiks started a shoe-throwing agitation against the image of Narayan Rane | शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलनात शिरूरमधील असंख्य शिवसैनिक उपस्थित

शिरूर : राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे यांचा निषेध व्यक्त करत शिरूरमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा म्हणून निवेदन देण्यात आले आहे. 

यावेळी जिल्हा सल्लागार अनिल काशीद, जिल्हा उपप्रमुख पोपट शेलार, युवा सेना जिल्हा अधिकारी बापु शिंदे ,उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे ,महिला आघाडीच्या शैलजा दुर्गे,शहर प्रमुख मयूर थोरात व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी तहसीलदार लैला शेख यांनाही निवेदन देण्यात आले 

''केंद्रिय मंत्री हे पद देशाचे आदराचे स्थान आहे. त्या स्थानावर बसलेल्या व्यक्तीने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले उध्दव ठाकरे यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.''

Web Title: In Shirur, Shiv Sainiks started a shoe-throwing agitation against the image of Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.