शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर

By admin | Updated: February 18, 2017 02:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत

शिरूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत. २० उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे, तर दोन उमेदवारांनी शाळाच पाहिली नाही.यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती शिक्षणापेक्षा निवडून येण्याची क्षमता, घराणे व आर्थिक क्षमता या निकषांवर जास्तीतजास्त उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.लोकशाहीने निवडणूक लढवताना शिक्षणाची अट टाकली नाही. अट असती तर सर्वच पक्षांना पदवीधर, उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घ्यावा लागला असता. जि.प., पं. स. च्या तालुक्यातील अनुक्रमे ७ व १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी बऱ्याच कसरतीने उमेदवार निश्चित केले. किमान १५ ते २५ हजार मतदारांनी निवडून दिलेल्या सदस्याने या गटाचे, गणाचे प्रश्न नीटनेटकेपणे जिल्हा परिषद, पंचायत समितीत मांडून गट व गणाचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र सुशिक्षित सदस्य (किमान पदवीधर) असतील तर कारभार चालवताना निश्चितच सोपे जाईल, अशी सर्वसाधारण मतदारांची अपेक्षा असते. नाही तरी एकदा निवडून आल्यावर सदस्याचे पाच वर्षांत क्वचितच दर्शन होत असल्याने तो सुशिक्षित असला काय आणि नसला काय मतदारांना याचे काही घेणे देणे नसावे.या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असे प्रत्येकी एक उमेदवार हा ग्रॅज्युएट आहे. नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या उमेदवारांमध्ये चार भाजपा, तीन अपक्ष, तर एक काँग्रेसच्या उमेदवाराचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी १३ उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. यात पाच राष्ट्रवादी, दोन भाजपा, तीन शिवसेना, दोन काँग्रेस तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. पं.स.साठी सर्वाधिक पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. यात दहापैकी सहा पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. भाजपाचे तीन तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा यात समावेश आहे. जि. प. च्या राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार या पोस्ट पदवीधर आहेत. पं. स. ला राष्ट्रवादीचे दोन तर भाजपाचा एक उमेदवार पोस्ट पदवीधर आहे.शाळेची पायरीच न चढलेल्या उमेदवारांत एक उमेदवार भाजपाचा तर एक उमेदवार शिवसेनेचा आहे. उमेदवारांच्या शिक्षणाबाबतच्या या वास्तवामुळे आश्चर्याचे कारण नाही. कारण ग्रामीण भागातील या निवडणुकांत शिक्षण हा फारसा महत्त्वाचा मुद्दा नसतो. निवडून येण्याची क्षमता, त्या उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती आणि  पक्षाची ताकद याला जास्त  महत्त्व असते. (वार्ताहर)