शिरूर : शिरूर नगरपरिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे 1925 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अलका खंडरे यांचा पराभव केला. त्यांना 6874 मते मिळाली. तर भाजपच्या सुवर्णा लोळगे या तीन फेऱ्या पर्यंत दुसऱ्या स्थानी होत्या. परंतु आखेरिस तिसऱ्या स्थानी गेल्या.
24 जागांपैकी भाजपचे 11 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले राष्ट्रवादी अजित पवार गट - 7, राष्ट्रवादी शरद पवार गट - 5, अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत उद्योजक प्रकाश धरीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी चे 21 पैकी 17, भाजपचे 2, लोकशाही क्रांती आघाडीचे 1 व अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले होते. भाजप वेगळता इतर पक्षानी निवडणूक लढावली नव्हती. विकास आघाडित सर्व एकत्र होते
चौथ्या शेवटच्या फेरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व एकूण मते
1) एश्वर्या पाचर्णे (अजित पवार गट) - 87992) सुवर्णा लोळगे (भाजप) - 67423) अलका खंडरे (शरद पवार गट) - 68744) रोहिणी बनकर (शिवसेना शिंदे गट)- 3905) वैशाली वखारे - 4816) नोटा - 186
Web Summary : Aishwarya Pacharne of NCP (Ajit Pawar faction) won the Shirur Nagar Parishad election with 8799 votes, defeating Alka Khandre (Sharad Pawar faction). BJP secured 11 councilor seats, NCP (Ajit Pawar) 7, NCP (Sharad Pawar) 5, and Independents 1.
Web Summary : एनसीपी (अजित पवार गुट) की ऐश्वर्या पाचरने ने 8799 वोटों के साथ शिरूर नगर परिषद चुनाव जीता, अलका खंद्रे (शरद पवार गुट) को हराया। बीजेपी ने 11 पार्षद सीटें, एनसीपी (अजित पवार) 7, एनसीपी (शरद पवार) 5 और निर्दलीय 1 जीतीं।