शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरुर लोकसभेची निवडणूक म्हणजे एकनिष्ठ विरोध बेडूक उड्या मारणारा- अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:03 IST

शिरूरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी होणार आहे, असा टोला मारला....

- चंद्रकांत मांडेकर

चाकण (पुणे) : शिरूर लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे या वेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उतरणार आहेत. त्यांच्या या चौथ्या पक्षप्रवेशाला शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा देत चिमटा काढला. हाच धागा पकडून त्यांनी शिरूरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी होणार आहे, असा टोला मारला.

शरद पवार यांनी शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर केल्यापासून ते मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा गुरुवारी (ता. २१ मार्च) दौरा केला. त्या दौऱ्यात राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी एखादा योद्धा शरण येत नाही, तेव्हा त्याला बदनाम केलं जातं, अशी प्रतिक्रिया 'ईडी'ने मद्य धोरण घोटाळ्यातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेवर दिली होती.

अजित पवारांवर टीका-

केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर जे झुकत नाहीत, त्यांचा केजरीवाल केला जातो आणि जे झुकतात त्यांना एका वॉशिंग मशीनमध्ये घालून सत्तेत सामील करून घेतले जाते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केला. शरण जाण्यापेक्षा लढणं पत्करणाऱ्या केजरीवालांचे त्यांनी कौतुक केलं.

प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण

मोदी गॅरंटी ही देशाची दिशाभूल असल्याची टीका कोल्हे यांनी या वेळी केली. अब की बार, चारसो पार, म्हणता मग दोन पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी) का फोडता, तिसऱ्या पक्षाचे (काँग्रेस) नेते का पळविता, अशी खोचक विचारणा अमोल कोल्हे यांनी केली. हे कमी म्हणून की काय मनसे नेत्यांच्याही गाठीभेटी घेणाऱ्या भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

अजितदादा आणि मोहितेंच्या भेटीवर कोपरखळी

आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पराभवासाठी अजित पवारांना एवढी मोठी ताकद उभी करावी लागल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष असूनही त्यांना एखाद्या आमदाराची (आढळरावांच्या राष्ट्रवादीकडूनच्या उमेदवारीला विरोध करणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी यावे लागणे, ही परिस्थिती खूप बोलकी आहे, ती सारेकाही सांगून जात आहे, अशी कोपरखळी त्यांनी परवाच्या अजितदादा आणि मोहितेंच्या भेटीवर मारली.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवारlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकShirurशिरुर