शिरूरमध्ये बोगस डॉक्टरांचा राजरोस धंदा

By Admin | Updated: June 12, 2014 05:30 IST2014-06-12T05:30:57+5:302014-06-12T05:30:57+5:30

तालुका आरोग्य विभागाच्या संदिग्ध भूमिकेमुळे तालुक्यातील गावात बोगस डॉक्टरांचा धंदा सुरूच आहे.

In Shiroor, a bogus doctor's saritya business | शिरूरमध्ये बोगस डॉक्टरांचा राजरोस धंदा

शिरूरमध्ये बोगस डॉक्टरांचा राजरोस धंदा

शिरूर : तालुका आरोग्य विभागाच्या संदिग्ध भूमिकेमुळे तालुक्यातील गावात बोगस डॉक्टरांचा धंदा सुरूच आहे. या तिन्ही डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात येऊनदेखील त्यांचे दवाखाने सुरूच आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी, आम्ही फक्त एफआयआर दाखल करतो; पुढील कारवाई आमच्या हातात नाही, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने मात्र पुढील कारवाईही आपल्याच हातात असल्याचे कोरेगाव भीमा येथे तालुका अधिकाऱ्यास बजावले.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सील, महाराष्ट्र आयुर्वेदिक कौन्सील, महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सील व महाराष्ट्र दंतचिकित्सा कौन्सील यांच्या परवान्याशिवाय जे वैदयकिय व्यवसाय सुरू करतात त्यांना बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जाते. तालुक्यात कोरेगाव भिमा येथे डॉ.पिंटू विश्वास, करंदी येथे डॉ.किशोर बाईल व कान्हुर मेसाई येथे डॉ. सुजल कांती यांनी उपरोक्त कौन्सीलच्या परवान्या व्यतिरिक्त तालुक्यात दवाखाने सुरू केले. तालुक्यात वैदयकिय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती तालुका आरोग्य विभागाकडे असते. यात परवाना व विनापरवाना डॉक्टर यांची शहानिशा करण्याची जबाबदारी या विभागाचीच आहे. असे असताना हे दवाखाने अनेक वर्ष बिनदिक्कतपणे सुरू असताना तालुका आरोग्य विभागाने याकडे हेतुपरस्पर कानाडोळा केला.
उपरोक्त तीनही डॉक्टरांवर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: In Shiroor, a bogus doctor's saritya business