शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर एसटीस्थानकाचे जानेवारीत स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 20:18 IST

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असणार आहे. ते काम सुरू करण्यासाठी एसटी स्थानक हलवण्यात येईल.

ठळक मुद्देमेट्रो भुयारी मार्गाचे काम: दोन वर्षांसाठी मुळा रस्त्यावर जाणारजानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरूवातशिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलिकडे रेंजहिल येथे मेट्रोचा भुयारात प्रवेश

पुणे : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ते मुळा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर (वळू पैदास केंद्राजवळ) जाणार आहे. जानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरूवात होईल.मेट्रोच्या भुयारी मार्ग प्रकल्पाचे प्रमुख अभियंता प्रमोद आहूजा यांनी ही माहिती दिली. ५ किलोमीटरच्या या भूयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असणार आहे. ते काम सुरू करण्यासाठी म्हणून एसटी स्थानक हलवण्यात येईल. मुळा रस्त्यावर कृषी महाविद्यालयाची एक जागा आहे. त्या जागेवर एसटी स्थानक असणार आहे. त्याचे आता आहे तसेच बांधकाम महामेट्रो करून देणार आहे. एसटी महामंडळाबरोबर यासंदर्भात बोलणी झाली असून त्यांची याला संमती आहे.आहूजा म्हणाले, हा मार्ग ५ किलोमीटरचा आहे. त्यात ५ भुयारी स्थानके असतील. शिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलिकडे रेंजहिल येथे मेट्रोचा भुयारात प्रवेश होईल. तिथे एक स्थानक असेल. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आताच्या जागेवर भुयारी मार्गातील दुसरे, त्यापुढे फडके हौद (कसबा पेठ), मंडई (जुनी मिनर्व्हा टॉकिजजवळ) व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके असतील. त्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही येत्या १५ दिवसात पूर्ण होईल. जानेवारीच्या सुमारास कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. मेट्रो भुयारात शिरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शाफ्टचे काम सुरू झाले आहे. सर्व कामांची आरेखने तयार व अंतिम झाली असल्याची माहिती देऊन आहुजा म्हणाले, भुयारी काम बरेच क्लिष्ट आहे. त्यामुळे किमान २ वर्षे तरी शिवाजीनगर एसटी स्थानक बाहेरच असेल. भुयारी स्थानकाचे काम झाल्यावर मात्र पुन्हा पूर्वीच्याच जागी एसटी स्थानक बांधण्यात येईल. हा सर्व खर्च अर्थातच मेट्रो करणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाची संमती मिळाली आहे. फडके हौद व अन्य काही स्थानकांच्या इथे खासगी जागा संपादन करावे लागणार आहे. फडके हौद वगळता अन्य ठिकाणी फारशा अडचणी नाहीत. फडके हौदाजवळ मात्र काही कुटुंबे यात बाधीत होणार आहेत. त्यांना जागा देण्यात येईल. जागा मालकांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल. याबाबत बोलणी सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका