शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:41 IST

चुकीच्या घडणाऱ्या घटनांची आपण पोलिसांना माहिती द्या, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार

शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि. २८) गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी रविवारी रात्री गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उघड झालेल्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाची निषेध सभा घेत सदरील घटनेविषयी रोष व्यक्त केला.            मोहितेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय नराधमाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या  वयाचा फायदा घेवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नराधम आरोपी आसिम मुलाणी याने पीडित अल्पवयीन मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत वारंवार अत्याचार केला. झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत होता. याप्रकरणी आसीम मुलानी (रा. शेलपिंपळगाव) याचेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.           दरम्यान मांजरेवाडी येथील खुनाची घटना ताजी असतानाच तालुक्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा घेतली. या निषेध सभेला गावातील नागरिक व महिलांची संख्या लक्षणीय होती. गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिरालगत असलेले नॉनव्हेज विक्रीचे शॉप बंद करावे, जामा मस्जिदलगत अतिक्रमण करून केलेल्या पायऱ्या काढून टाकाव्यात तसेच नमाज पठण करण्यासाठी बाहेर गावांहून येणाऱ्यांवर बंदी घालावी अशा मागण्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत 'गाव बंदची' हाक दिली. त्यानुसार गावात एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शेलपिंपळगाव हद्दीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आरोपींना शासन करण्यासाठी प्रशासन सक्षम असून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नका. विंचूवाची नांगी आम्ही ठेचून काढू. चुकीच्या घडणाऱ्या घटनांची आपण पोलिसांना माहिती द्या. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. - प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण

 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMuslimमुस्लीम