शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मदतीमुळे 'चिमुरडी' सुखरूप पोहचली आईच्या कुशीत; पुण्यात दिव्यांग जोडप्याला दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 20:31 IST

आपल्याला काही करून आईकडे पुन्हा जायचे आहे. असा तिचा आग्रह सुरू झाला.

ठळक मुद्देपुणे शहरात अत्यावश्यक सेवा व महत्वाच्या कारणासाठी डिजिटल पास कक्ष सुरू

पुणे : पुण्यात एक दिव्यांग मूकबधिर जोडप्याला पोलिसांमुळे दिलासा मिळाला आहे. या जोडप्याची सात वर्षांची मुलगी आपल्या आजीला भेटायला गावाला गेली. मात्र लॉकडाऊन झाला आणि ती त्या गावी अडकून पडली. आपल्याला काही करून आईकडे पुन्हा जायचे आहे. असा तिचा आग्रह सुरू झाला. अखेर पोलिसांनी त्या मुलीच्या मामाला पुण्याला येऊन मुलीला सोडण्याची परवानगी दिली. पोलिसांच्या सहकार्यामुळे ती चिमुरडी आपल्या आईच्या कुशीत सुखरूप पोहचली. पुणे शहराच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिह यांच्या देखरेखीखाली डिजिटल पास कक्ष सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी पुण्यातील एका दिव्यांग मूकबधिर जोडप्याची समस्या त्यांना सांगितली. या जोडप्याला सात वर्षांची मुलगी असून ती काही दिवसांपूर्वी आपल्या आजीला भेटायला गेली होती. 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यावर तुला पुण्याला येता येईल. असे त्यांनी मुलीला सांगितले. मात्र मुलीला काही करून आईकडे यायचे होते. यावर त्या मुलीच्या मामाला पोलीस उपआयुक्तांकडून पुण्याला येण्याची व पुन्हा गावाला जाण्याची  परवानगी मिळाली. तसेच प्रवासा दरम्यान काही अडचण आल्यास युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी स्वत:चा मोबाईल नंबर देखील दिला होता. यानंतर ती मुलगी सुखरूप आपल्या आईवडिलाकडे पोहचली. पोलिसांनी संकटकाळी केलेल्या मदतीबद्दल जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण दिवसरात्र काम करत आहात. अशावेळी आपल्याला देखील मुलाबाळांना वेळ देणे शक्य नाही. याप्रसंगी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांना सहकार्य करण्याचे काम पोलिसांनी केले. या शब्दांत त्यांनी पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसDivyangदिव्यांग