शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्यांनी गाेळा केली साेनिया गांधी यांची 1 हजाराहून अधिक छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:09 IST

काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांची वर्तमानपत्रात छापून आलेल्या 1 हजार छायाचित्रांचा संग्रह पुण्यातील अनुपमा जाेशी यांनी केला आहे.

पुणे : काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांच्या नेतृत्वाला भाळून त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून पुण्यातील त्यांच्या चाहत्या अनुपमा जाेशी यांनी 2003 सालापासून विविध वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेली साेनिया गांधी यांच्या छायाचित्रांचा संग्रह केला आहे. साेनिया गांधी यांच्या विविध मुद्रांमधील छायाचित्र अनुपमा यांच्याकडे आहेत. त्यांनी या छायाचित्रांचे दाेन वेळेस प्रदर्शन देखील भरविले आहे.

    अनुपमा या नाेटरी म्हणून व्यवसाय करतात. त्यांनी काॅंग्रेसच्या शहर सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. 2003 सालापासून त्यांनी साेनिया गांधी यांच्या वर्तमामपत्रांमध्ये छापून आलेल्या छायाचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांच्याकडे 1 हजाराहून अधिक छायाचित्रे जमा झाली. त्यांनी या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील दाेनदा भरविले आहे. सध्या त्यांनी ही सर्व छायाचित्रे कार्डशिट्सवर चिकटवून त्यांचे जतन केले आहे. त्याचबराेबर त्यांनी जमा केलेली छायाचित्रे कुठल्या वर्षाची आहेत हेही त्यांनी लिहून ठेवले आहे. गेल्या 15 वर्षांपासून अनेक सभांचे, समारंभाचे साेनिया गांधी यांचे फाेटाे त्यांच्याकडे आहेत. हे सर्व फाेटाे त्यांना साेनिया गांधी यांना दाखविण्याची त्यांची इच्छा आहे. जाेपर्यंत शक्य हाेईल ताेपर्यंत त्यांच्या फाेटाेंचा संग्रह करणार असल्याचे अनुपमा म्हणतात.     अनुमपा म्हणाल्या, मी काॅंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून काम केले आहे. मला वाटतं साेनिया गांधी ह्या काॅंग्रेस पक्षाचा आत्मा आहेत. महिलांसाठी त्या एक आदर्श आहेत. त्या एक प्रभावशाली महिला आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. मी जेव्हा त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली त्यानंतर मला माझ्या मित्र - मैत्रिणींनीसुद्धा मदत केली. त्यांनी त्यांच्याकडील साेनिया गांधी यांची छायाचित्रे मला दिली. या छायाचित्रांच 2005 साली पहिलं प्रदर्शन भरविण्यात आलं. या छायाचित्रांचं डिजिटायझेशन करण्याचा माझा विचार आहे. यापुढेही मी त्यांची छायाचित्रे गाेळा करत राहणार आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीKoregaon Parkकोरेगाव पार्कcongressकाँग्रेस