शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

परिचारिकेची वेशभूषा करून ससून रूग्णालयातून तीन महिन्याचे बाळ पळविले; आरोपी महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 11:41 AM

रुग्णालय प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.

पुणे : परिचारिकेची वेशभूषा करून ससून रूग्णालयातून तीन महिन्याच्या बाळाला पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. रिक्षाचालकाच्या मदतीमुळे आरोपी महिलेला अटक करण्यात यश मिळाले आणि बाळ आईला सुखरूपणे मिळाले. बाळाला पाहाताच आईला अश्रू अनावर झाले. दरम्यान, या घटनेमुळे  ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

वंदना मल्हारी जेठे (वय 24 रा.थिटे वस्ती खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.  तपासासाठी तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेशन्यायालयाने दिला आहे. कासेवाडी परिसरात राहाणारी बावीस वर्षीय महिला श्वेता उमेश कांबळे आणि त्यांचे बाळ हे ससून रूग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या मोठ्या मुलीची सोनाग्राफी करायची असल्याने आपल्या बाळाला ओळ्खीच्या महिलेकडे दिले आणि ती महिला मुलीबरोबर आत गेली.

मात्र त्या ओळखीच्या महिलेचे पती रूग्णालयात उपचार घेत असल्याने डॉक्टरानी त्या महिलेला बोलावले. त्यावेळी आरोपी महिला त्यांच्या शेजारीपरिचारिकेच्या वेशभूषेत बसली होती. ’माझ्याकडे बाळाला द्या, आई आली की मी बाळाला त्यांच्याकडे देईन असे म्हणून आरोपी महिलेने त्यांना आश्वस्त केले. मात्र जेव्हा बाळाची आई बाहेर आली तेव्हा तिला दोघी महिला आणि बाळ दिसले नाही. ती रूग्णालयाच्या बाहेर गेल्यानंतर तिने सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकाकडे बाळासंबंधी विचारपूस केली. तेव्हा रिक्षाचालकाने एक महिला बाळ घेऊन जाताना बाहेर पडली असून, माझ्या मित्राच्याच रिक्षेत बसल्याचे रिक्षाचालकाने सांगितले.

रिक्षाचालकाने मित्राला फोन केला आणि त्याला सर्व हकिकत सांगितली. आरोपी महिलेला पकडून रिक्षाचालक आणि बाळाच्या आईने पोलिसांच्या ताब्यात दिले बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी महिलेचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तिला मूल होत नसल्याने तिने बाळ पळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक वंदना सपकाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेPoliceपोलिस