शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Sararthi वर थेट शरद पवारांचे लक्ष; संस्थेची जबाबदारी अजित पवारांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 21:48 IST

सारथीच्या सध्याची कामे व भविष्यातील नियोजनाचा घेतला आढावा

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील सारथीची बैठक

पुणे : गेल्या काही महिन्यांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सारथीची धुरा आल्यानंतर अनेक चांगले बदल व सुधारणा झाल्या आहेत. सारथीच्या इमारतीचा विषय असो की निधी, योजना मार्गी लागल्या आहेत. ऐवढेच नाही तर सारथी संस्थेमुळे नुकत्याच झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत मराठा समाजाचा टक्का वाढला असून, संस्थेचे 21 विद्यार्थी यशस्वी झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सारथीचा कारभार उत्तम सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच थेट सारथीत लक्ष घातले आहे. पवार यांनी शुक्रवारी सारथी संस्थेची सध्याची कामे व भविष्यातील नियोजनाचा आढावा घेतला. 

विभागीय आयुक्त कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील सारथीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,  सारथीचे अधयक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्यासह अनेक महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. 

मराठी व मराठी कुणबी समाजातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी स्थापन झालेली सारथी संस्था स्थापनेपासूनच चर्चेत आहे. महाआघाडीमध्ये सारथीची जबाबदारी सुरूवातील काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली होती. 

सारथी अधिक गतीने काम करेल अशी अपेक्षा

पुण्यात सारथी संस्थेचे आंदोलन पेटल्यानंतर वडेट्टीवार यांच्याकडे असलेली सारथीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर काही तासात पवार यांनी सारथीचा निधीचा प्रश्न मार्गी लावला होता. तर गेल्या एक वर्षभरात सारथीला मुख्य कार्यालयाची इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून इमारत बांधकामासाठी निधी, नियमित कामकाजासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सारथीच्या नवीन इमारतीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सध्या सुरू असलेले उपक्रम आणि भविष्यातील विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आता शरद पवार यांनीच थेट लक्ष घातल्याने सारथी अधिक गतीने काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस