पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि चिंतेचे कोणतेही कारण नाही. पुढील काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून नियमित औषधोपचार सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तपासण्या समाधानकारक आढळल्याने त्यांना मर्यादित प्रवासास परवानगी देण्यात आल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले
Video : शरद पवारांची प्रकृती सुधारली; शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:47 IST