शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार; राष्ट्रवादीकडून प्रशांत जगतापांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 19:18 IST

येत्या विधानसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक होणार असल्याने, मतदार कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली, तर मनसेने शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना संधी दिली. महाविकास आघाडीमध्ये मात्र या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष की शिवसेनेचा ठाकरे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर या जागेचा तिढा सुटला आहे. माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हडपसरमध्येहीशरद पवार विरुद्ध अजित पवार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हडपसर विधानसभा मतदार संघाची जागा उद्धव ठाकरे गटाने मागितली होती. त्यावरून रस्सीखेचही सुरु झाली होती. मात्र अखेर जागेचा तिढा सुटून शरद पवार गटाला ही जागा मिळाली आहे. या विधानसभेच्या रणधुमाळीत जगतापांना उतरण्याची संधी मिळाली. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये २००९ मध्ये हडपसर मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर, २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल झाल्याचे दिसत आहे. 

मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने हडपसरमधून विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीत मात्र २ राष्ट्रवादीतच निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदार कोणाला आमदार होण्याची संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. अशातच मनसेने यावेळी हडपसरला उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.     

हडपसर विधानसभा मतदार संघाचा इतिहास 

राज्यातील विधानसभा मतदारसंघाची २००९ साली पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचनेपूर्वी हडपसरचा भाग पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात होता. २००९ साली हडपसर मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर २००९ साली युती आणि आघाडी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेचे महादेव बाबर यांना ६५ हजार ५१७, तर शिवरकर यांना ५५ हजार २०८ मते मिळाली होती. बाबर यांना २ हजार ०१८ मतांनी निवडून आले होते. २०१९ मध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तर शिवसेना-भाजप युतीकडून योगेश टिळेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चेतन विठ्ठल तुपे यांना ९२ हजार ३२६ तर योगेश टिळेकर यांना ८९ हजार ५०६ एवढी मते मिळाली होती. या निवडणुकीत केवळ २ हजार ८२० च्या फरकाने चेतन तुपे निवडून आले होते. २०१४ ची निवडणूक ही प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढवली होती. यामध्ये ती भाजपकडून योगेश टिळेकर यांना ८२ हजार ६२९ तर शिवसेनेकडून महादेव बाबर यांना ५२ हजार ३८१ राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांना २९ हजार ९४७ तर काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर यांना २२ हजार १०० , प्रमोद भानगिरे यांना २५ हजार २०८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाच्या लाटेत ३० हजार मतांनी योगेश टिळेकर विजयी झाले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hadapsar-acहडपसरSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी