शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही  - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:44 IST

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. भारतीय जनता पक्षाकडून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्याला केंद्र सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. तसेच देशावर आलेलं भाजपचं संकट परतवून लावावे लागेल असे आवाहन केले होते. त्याला आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, पवार साहेब काय म्हणतात, यामुळे केंद्र सरकारचा पराभव होणार नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं त्यावर केंद्रात सरकार कुणाचं ते ठरेल. सर्वसामान्य माणूस सुखी आहे. साडेचार कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. त्यामुळे पवार साहेबांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या मनात आलं तरंच केंद्र सरकार पडेल. 

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत. या यंत्रणेच्या वतीने उत्तर द्यायला मी काही त्यांचा अधिकारी नाही. सरकार पडण्याच्या विषयात सांगायचं तर सरकार पडणार नाही, परंतु सरकार पडणार नाही हे वारंवार का सांगावं लागते हा महत्वाचा मुद्दा आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे