शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

शरद पवारांना १०० आमदार निवडून आणता आले नाहीत- चंद्रशेखर बावनकुळे ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 16:45 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका...

बारामती (पुणे) :शरद पवार यांचे ८४ वय झाले तरीदेखील त्यांना विधानसभेचा शंभर आकडा गाठता आला नाही. त्यांना कधीही १०० आमदार निवडून आणता आले नाहीत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने १०० च्या पुढे आमदार निवडून आणले, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सोनगाव येथे भाजपच्या पक्षीय कार्यक्रमानिमित्त  शनिवारी (दि. २४) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा २०२४ साली पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा भाजपचे बारामतीसह महाराष्ट्रातील ४५ खासदार निवडून आलेले असतील. मी तोंडच्या वाफा फेकत नाही. हे परिवर्तन होणारच आहे. नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी पाटण्यामध्ये १९ पक्ष एकमेकांचे हात धरून एकत्र आले. २०१९ मध्ये देखील असेच १७ पक्ष एकत्र आले होते. आज दोनने संख्या वाढली आहे. जेवढा नरेंद्र मोदी यांना विरोध वाढेल तेवढ्या प्रमाणात जनता कमळाचे बटन दाबण्यासाठी धावत  जाईल, असं बावनकुळे म्हणाले.८५ पैसे बारामती अ‍ॅग्रोला पोहचत होते...

६५ वर्ष काँग्रेसने या देशावर सत्ता चालवले. मात्र या ६५ वषार्ची परिभाषा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली आहे. मी जेव्हा एक रुपया पाठवतो तेव्हा १५ पैसे जनतेपर्यंत पोहोचतात. १५ पैसे बारामतीला पोहोचतात तर उरलेले ८५ पैसे गेले कुठे? हे आम्ही नाही तर राजीव गांधीच म्हणत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हे ८५  पैसे बारामती अ‍ॅग्रो ला पोहोचतात, असा टोमणा मारला. मात्र मोदींच्या राज्यामध्ये मताच्या रूपामध्ये त्यांनी जे कर्ज घेतले आहे ते व्याजासहित जनतेला विकासाच्या माध्यमातून  परत केले जात आहे. आता जर मोदींनी बारामती मध्ये एक रुपया पाठवला तर एकच रुपया बारामती मध्ये येतो, असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राहूल गांधी यांच्या आदेशाने कर्नाटकमधील धर्मांतर बंदी कायदा रद्द...

परवाच शरद पवार यांनी एक ट्विट केले आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यामुळे मला आता मुस्लिम व ख्रिश्चनांची चिंता वाटते. यांचे सरकार गेल्यानंतर यांना मुस्लिम ख्रिचनांची आता चिंता वाटते. धनगर आणि ओबीसी समाजाची चिंता वाटते. सरकारमध्ये होते तेव्हा उद्योगपती आणि व्यापाऱ्यांची चिंता होती. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांची नामांतर करणे चूक होते का? मात्र शरद पवार यांनी मी आयुष्यभर छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबादच म्हणेल. मी अहमदनगर म्हणणार अहिल्यानगर म्हणणार नाही, असं म्हणाले हे तुम्हाला मान्य आहे का? कर्नाटकमध्ये पंजाचे सरकार आले. तत्पूर्वी भाजपचे सरकार असताना धर्मांतर बंदी कायदा आणला होता. मात्र राहुल गांधी यांच्या एका आदेशाने त्या सध्याच्या काँग्रेस सरकारने कर्नाटक मधील हा कायदा रद्द केला, असेही यावेळी चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी