शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

फुटीनंतर शरद पवार अन् अजितदादा प्रथमच एका मंचावर; मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 15:38 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला २०१९ पासून बरेच धक्के बसू लागले आहेत

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते पूजाअर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर ठीक ११:४५ वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवारही उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला २०१९ पासून बरेच धक्के बसू लागले आहेत. महाविकास तयार होऊन राज्यात सत्ताबदल होणे. त्यानंतर पुन्हा शिंदे गट भाजपसोबत जाऊन भाजप शिंदेंचं नवीन सरकार येणे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची जगभरात चर्च सुरु झाली होती. अशातच राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नाट्यसत्तांतराला वेगळेच वळण आले. अजित पवार आमदार घेऊन भाजप आणि एकनाथ शिंदे गटासोबत गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठावंत राजकीय नेत्यांना हा मोठा धक्काच होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे  २ गट पडले. अजितदादांनी आमचा विठ्ठल एकच असल्याचे सांगितले. त्यांनी शरद पवारच आमचे नेते असल्याचे जाहीरही केले. परंतु शरद पवारांनी अजित पवार हे राष्ट्रवादीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. या घडामोडींमध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी शरद पवारांची भेटही घेतली. पण शरद पवार यांनी त्या भेटीनंतर काही प्रतिक्रिया दिली नाही. आणि आम्ही कोणाबरोबरही जाणार नसल्याचे सांगितले. आता या महानाट्यानंतर शरद पवार आणि अजित पवार आता एका मंचावर येणार आहेत. ते समोरासमोर आल्यावर काय चित्र असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

त्यानंतर दुपारी १२:४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. 

सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरेदेखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदी