शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:13 IST2022-02-23T13:02:06+5:302022-02-23T13:13:10+5:30
पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे...

शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला- चंद्रकांत पाटील
पुणे: समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा शरद पवारांचा (sharad pawar) प्रयत्न नेहमीच राहिला आहे. कधी ते मराठे विरुद्ध नॉन मराठे असा विषय सुरू करतात तर कधी ते अल्पसंख्याक विरुद्ध नॉन अल्पसंख्याक असा वाद सुरू करतात, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, गेल्या 50 वर्षापासून शरद पवारांचे सुरू असलेलं राजकारण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजालाही हे माहीत आहे की हे सर्व मतांसाठी सुरू आहे. त्यामुळे ते याला सिरीयस घेत नाहीत, असंही पाटील म्हणाले.
आज चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेत पत्रकार परिषदेत घेतली. त्यातील प्रमुख मुद्दे-
-काँग्रेसकडे टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करतात.
-आमचा येणाऱ्या महापालिकेत मुद्दा हाच आहे ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष. आम्ही काय केलं सांगू तुम्ही काय केलं ते सांगा