सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला प्रकरण: आराेपी शंतनू जाधवची येरवडा कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 21:02 IST2023-07-01T21:00:15+5:302023-07-01T21:02:27+5:30
तरुणाची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली...

सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला प्रकरण: आराेपी शंतनू जाधवची येरवडा कारागृहात रवानगी
पुणे : प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून सदाशिव पेठेत तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (दि. १) सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे या आराेपीचे नाव आहे. प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून त्याने २७ जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला केला हाेता.
या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. हल्ला झालेल्या २० वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.