खाऊचे आमिष दाखवून करत होता लैंगिक अत्याचार; भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:41 IST2017-12-22T14:38:17+5:302017-12-22T14:41:17+5:30

कधी खाऊचे आमिष दाखवत तर कधी धमकी देऊन मागील एक महिन्यापासून पहिलीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे.

Sexual harassment; one arrested by Bharti University police, pune | खाऊचे आमिष दाखवून करत होता लैंगिक अत्याचार; भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खाऊचे आमिष दाखवून करत होता लैंगिक अत्याचार; भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देमागील महिन्यापासून पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे आले समोरआरोपी सागरे याचे भाजी विक्रीचे दुकान असून त्याची पीडित मुलीच्या घरच्यांशी ओळख

पुणे : कधी खाऊचे आमिष दाखवत तर कधी धमकी देऊन मागील एक महिन्यापासून पहिलीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. मुलीने मामीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 
प्रशांत परमेश्वर सागरे (वय २५, रा. भारती विद्यापीठ परिसर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागरे व पीडित मुलीचे कुटुंबीय शेजारी शेजारी राहण्यास आहेत. पीडित मुलगी सहा वर्षांची असून पहिलीमध्ये शिकण्यास आहे. तिचे आईवडील बिगारी काम करतात. तिचा मामा शेजारीच राहण्यास आहे. आरोपी सागरे याचे भाजी विक्रीचे दुकान असून त्याची पीडित मुलीच्या घरच्यांशी ओळख आहे. 
पीडित मुलीचे आईवडील कामावर गेल्यानंतर आरोपी या मुलीला बोलावून घेत असे. तिला खाऊचे आमिष दाखवत तसेच प्रसंगी धमकी देत तिच्याशी लैंगिक चाळे करीत होता. तिच्यासोबत त्याने अनैसर्गिक कृत्यही केले आहे. मागील एक महिन्यापासून तो या मुलीवर अत्याचार करीत होता. 
याबाबत, पीडित मुलीने मामीकडे तक्रार देऊन त्रास होत असल्याचे सांगितले. मामीने गुरुवारी पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत आरोपीला तत्काळ अटक केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत. 

Web Title: Sexual harassment; one arrested by Bharti University police, pune

टॅग्स :Puneपुणे