चऱ्होलीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 14:20 IST2018-04-12T14:20:35+5:302018-04-12T14:20:35+5:30
चऱ्होली येथे एका दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चऱ्होलीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पिंपरी : चऱ्होली येथे एका दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी घडला. भारत सुरवसे (वय २८, रा. लोहारा, उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलाच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आरोपीने दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. घडलेला प्रकार मुलाने घरी सांगितला. त्यानुसार मुलाच्या आईने बुधवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून महिला पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम तपास करत आहेत. आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविण्यात आले आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.