शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चौदा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती करणाऱ्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 15:41 IST

न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली

पुणे : चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या तरुणाला विशेष जलदगती न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.     सागर सतीश सोनवणे (वय २२, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दोषी व्यक्तीने दंड न भरल्यास दोन वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल, तसेच दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. आरोपी सागर सोनवणेविरोधात अपहरण, बलात्कार, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) अशा विविध कलमांनुसार वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित मुलीच्या आजीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यान घडली.

आरोपी व पीडित मुलीची मैत्री होती. आरोपीने पीडितेला लग्नाची मागणी घालून तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. दरम्यान, ४ जुलै २०१९ रोजी पीडिता सकाळी साडेसहा वाजता शाळेत गेली. शाळा सुटल्यावर पीडितेच्या आजीने तिला घरी जाण्यास सांगितले. पीडिता घरी आली नाही. पीडितेच्या आजीने नातीचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी पीडितेच्या आईने आरोपीला फोन केला असता, त्याने पीडित मुलगी आपल्यासोबत असल्याचे सांगितले. पीडितेच्या आईने पीडिता व आरोपीला वानवडी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवित आरोपीला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

डीएनए चाचणी पुरावा ठरला महत्त्वाचा

या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडिता आणि तपासी अंमलदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. डीएनए चाचणी पुराव्यातही आरोपी हा पीडितच्या मुलाचा जनुकीय पिता असल्याचे सिद्ध झाले. आरोपीने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र, या प्रकारामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे आरोपीला अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील ब्रह्मे यांनी केली. तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितेला भरपाई देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषण