एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:23+5:302021-07-20T04:10:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकार विविध महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचारात आहे. त्यादृष्टीने हालचालीदेखील ...

Seventh Pay Commission should be implemented for ST employees | एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य सरकार विविध महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचारात आहे. त्यादृष्टीने हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळ ना नफा ना तोटा या तत्त्वावर प्रवासी सेवा देते. असे असताना महामंडळ हे तोट्यात असल्याचे कारण सांगून एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करता येणार नसल्याचे मंत्रिमंडळाने जाहीर केले. तेव्हा शासनाने पक्षपाती निर्णय न घेता राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, महामंडळ तोट्यात आहे, त्याला महामंडळाचे धोरण व शासन निर्णय जबाबदार आहे. मात्र विनाकारण त्याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडले जात आहे. तेव्हा शासनाने कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

Web Title: Seventh Pay Commission should be implemented for ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.