शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

सात कार्यालये हटविली

By admin | Updated: May 29, 2014 05:02 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरू ठेवली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरू ठेवली. वाल्हेकरवाडी परिसरातील २२ एकरवरील सुमारे एक लाख ७० हजार स्क्वेअर फुटांची ७ मंगल कार्यालये भुईसपाट केली. प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातील अनधिकृत मंगल कार्यालयांवर मंगळवारपासून कारवाई सुरू केली होती. काल आहेर गार्डन, माउली हॉलचे बांधकाम पाडण्यात आले. आज सकाळी सातपासून कारवाईस सुरुवात झाली. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्पाईन रस्त्यावरील संकल्प हॉटेलकडून चिंतामणी चौकाकडे जाणारा रस्ता, चिंचवडकडून वाल्हेकरवाडीकडे जाणारा रस्ता कै. धोंडूतात्या चिंचवडे चौकातून बंद केला होता. तर वाल्हेकरवाडी चौकातून आहेर गार्डनकडे येणारा रस्ता बंद केला होता. शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकासह सुमारे साडेतीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. १५ एकर जागेत ही कार्यालये होती. आज आहेर लॉन्स, शुभम गार्डन असे एकूण १ लाख चौरस फुटांचे बांधकामे पाडण्यात आले. ही कारवाई उप मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण पांढरे, कार्यकारी अभियंता चंद्रकात्ां जावळे, क्षेत्रिय अधिकारी सुरेश अंभग यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्या वेळी परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी ३ पोकलेन, ५ जेसीबी, २ डंपर वापरण्यात आले. नवनगर विकास प्राधिकरणाने लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई सुरू केली आहे. (प्रतिनिधी)