Seven hundred fifty crores fund will Expenditure for as it is aambil odha | आंबिल ओढा करण्यासाठी लागणार तब्बल साडे सातशे कोटी
आंबिल ओढा करण्यासाठी लागणार तब्बल साडे सातशे कोटी

ठळक मुद्देशहरातील २५ सप्टेंबरच्या पूरस्थितीनंतर प्रशासनाचा अहवाल तयारअहवाल सादर, गरजेनुसार तातडीने कामे हाती घेणार

पुणे :  गेल्या काही वर्षांत आंबिल ओढ्यावर उगमापासून थेट संगमापर्यंत विविध प्रकाराची अतिक्रमणे झाली आहेत. यामध्ये इमारती, मोठ्या प्रमाणात व्यावासायिक बांधकामे, नाला ग्रार्डन, सिमा भित्त आदी विविध स्वरुपांची अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या अतिक्रमणामुळे आंबिल ओढ्याची रुंदी २० वरून थेट चार, साडे चार मीटर तर काही भागात ५, ६, ७ मीटरपर्यंत कमी झाली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाली आहे. आंबिल ओढ्यावर झालेले अतिक्रण, ओढ्याची सद्स्थिती, तातडीने करावी लागणारी कामे अदी संदर्भातील अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. यामध्ये आंबिल ओढा पूवर्वंत करण्यासाठी तब्बल साडे सातशे कोटी रुपयांची मागणी देखील प्रशासनाने स्थायी समितीकडे केली आहे. 
    शहरामध्ये २५ संप्टेंबर रोजी रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे आंबिल ओढ्याला महापूर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.  यामुळे दक्षिण पुण्यातील हजारो सोसायट्यामध्ये पाणी शिरले, शेकडो घरे उद्धवस्त झाली, अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर हजारे-शेकडो चार चाकी व दुचाकी वाहने पाण्यासोबत वाहून गेली. यामुळे संपूर्ण शहरामध्ये हाहाकार माजला होता. त्यानंतर शहरातील ओढ्या-नाल्यावर झालेल्या अतिक्रमाणांची जोरदार चर्चा सुरु झाली. याबाबत प्रशसनाने देखील तातडीने आंबिल ओढ्याचा उंगम ते संगमपर्यंत सुमारे १० किलो मिटर चा सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे झाल्यानंतर ओढ्यावर झालेले अतिक्रण, तातडीने कराव्या लागणा-या उपया-योजना, सिमा भितींची कामे, कलवड बांधणे आदीबाबत सविस्तर अहवाल करुन स्थायी समितीला सादर केला आहे. 
    यामध्ये आंबिल ओढ्याच्या एकूण १० किलो मिटप पैकी साडे पाच किलो मिटरची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यामध्ये भविष्यात मोठी जिवितहानी टाळण्यासाठी आंबिल ओढ्यावर तातडीने १९०० शे मिटर तर जांदडेर पूल येथे सुमारे ९०० मिटरमध्ये सिमा भित्त उभारण्याची गरज आहे. या सिमा भिंत न बांधल्यास शहाराच्या विविध ४० ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना होऊ शकतात, असा स्पष्ट अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. यासाठी सुमारे ७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  दरम्यान आंबिल ओढ्यावर अनेक ठिकाणी झोपडपट्या, व्यावासायिक बांधकामे, इमारती, बैठी घरे, नाला ग्रार्डन,सिमा भिंती आदी स्वरुपाचीआदी स्वरुपांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे ओढ्याची रुंदी २० मिटर वरुन थेट सात, साडे सात, सहा, पाच आणि काही ठिकाणी तर तब्बल साडे चार मिटर पर्यंत कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे आंबिल ओढा पूर्ववंत करण्यासाठी तब्बल साडे सातशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.
-------------------------
अहवाल सादर, गरजेनुसार तातडीने कामे हाती घेणार
आंबिल ओढ्याला आलेल्या महापूरानंतर प्रशासनाच्या वतीने या ओढ्यावर झालेली अतिक्रमणे, पडलेल्या सिमा भिंती, कलवड आदीचा सर्व्हे करुन वस्तूस्थिती अहवाल सादर केला आहे. प्रशासनाने आंबिल ओढा पूर्ववंत करण्यासाठी तब्बल साडे सातशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु यामध्ये गरजेनुसार तातडीने करणे आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात येणार आहे.
- सुनिल कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष व आमदार

Web Title: Seven hundred fifty crores fund will Expenditure for as it is aambil odha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.