शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

प्री वेडिंग शूट करायचयं, तर ही अाहेत पुण्यातील 7 राेमॅण्टिक ठिकाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 7:25 PM

सध्या सगळीकडे प्री वेडिंग फाेटाेशूटची धूम अाहे. प्रत्येक जाेडप्याला लग्नाअाधी प्री वेडिंग शूट करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही अाहेत पुण्यातील खास 7 ठिकाणं

पुणे : सध्या प्री वेडिंगची धूम सर्वत्र पाहायला मिळते. अापणही सिनेमातील हिराे-हिराॅईन प्रमाणे दिसावं, त्यांच्यासारखे फाेटाे काढावेत अशी अनेक जाेडप्यांची इच्छा असते. त्यांच्यासाठी प्री वेडिंग शूट करुन दिला जाताे. तुम्ही सुद्धा प्री वेडिंग शूट करणार असाल तर पुण्यातील या सात ठिकाणांचा नक्की विचार करा. 

1) लवासापुण्यापासून अवघ्या 57 किलाेमीटरवर असलेली लवासा सिटी ही प्री वेडिंग शूटसाठीचे उत्तम असे ठिकाण अाहे. रंगबेरिंग इमारती, इमारतींच्या मध्ये असणारे तळे अाणि अाजूबाजूला असणारे डाेंगर असं एकंदर राेमॅण्टिक वातावरण येथे अाहे. लवासा सिटी मध्यला कुठल्याही भागात तुम्ही तुमचे फाेटाेशूट करु शकता. तसेच लवासाला जाताना लागणाऱ्या घाटातही तुम्हाला फाेटाे काढता येईल. त्याचबराेबर येथून जवळच वरसगाव धरण असल्याने तेथे जाऊनही तुम्हाला फाेटाे काढणे शक्य अाहे. 

2) एम्प्रेस गार्डन 39 एकरामध्ये असलेले एम्प्रेल गार्डन हे तरुणाईचे अावडीचे ठिकाण अाहे. घाेरपडी भागात असलेले हे गार्डन प्री वेडिंग शूटसाठी उत्तम ठिकाण अाहे. या गार्डनच्या रचनेमुळे फाेटाेशूटसाठी अनेक राेमॅण्टिक ठिकाणं येथे पाहायला मिळतात. त्यातच शहरातच हे गार्डन असल्याने तुमचा प्रवासाचा खर्च वाचू शकताे. 

3) पु. ल. देशपांडे उद्यान  पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन देणारे सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान हे एक नवीन प्री वेडिंग डेस्टिनेशन ठरत अाहे. उद्यानात असलेले तळे, त्या तळ्यांवर बांधण्यात अालेले छाेटे पूल सर्वांना अाकर्षिक करतात. विविध प्रकारची फुले सुद्धा येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पु.ल. देशपांडे उद्यान हा प्री वेडिंग फाेटाेशूटसाठी उत्तम पर्याय ठरु शकताे. 

4) मुळशीमुळा नदीवर असलेले मुळशी धरण परिसर म्हणजे निसर्गाचा अदभूत नजराणाच अाहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या मुळशीतील प्रत्येक ठिकाण हे फाेटाेशूट साठीचे उत्तम ठिकाण अाहे. सनसेटचे उत्कृष्ट फाेटाे तुम्हाला येथे काढता येईल. जर तुम्ही अाणि तुमचा पार्टनर अत्यंत राेमॅण्टिक असाल तर मुळखी तुमच्यासाठीचा एक सर्वाेत्तम पर्याय अाहे. 

5) पाताळेश्वरअाठव्या शतकातील पाताळेश्वर लेणी ही स्थापत्य कलेचा अद्भूत नजराणा अाहे. पुण्याच्या मध्यात जंगली महाराज रस्त्यावर ही लेणी अाहे. तुम्ही जर एेतिहासिक ठिकाणी फाेटाेशूट करायचे असेल तर पाताळेश्वर लेणी हा उत्तम पर्याय अाहे. 

6) अागाखान पॅलेस भारताच्या इतिहासात अागाखान पॅलेसला एक महत्त्वाचे स्थान अाहे. महात्मा गांधी यांचे पुण्यातील वास्तव्याचे हे ठिकाण हाेते. सुंदर इमारत अाजूबाजूचा परिसर मनमाेहून टाकताे. नगर राेडला हे ठिाकण अाहे. त्यामुळे तुम्हाला एक वेगळं फाेटाेशूट करायचं असेल तर अागाखान पॅलेस एक उत्तम ठिकाण अाहे. 

8) खडकवासला धरण प्रत्येक पुणेकरांच्या पसंतीचं ठिकाण म्हणजे खडकवासला धरण. पुण्यापासून अवघ्या 14 किलाेमीटर वर हे धरण अाहे. या ठिकाणचा सनसेट पाहण्यासारखा असताे.  चहूबाजूला हिरावाईने अच्छादलेला असा हा परिसर अाहे. या ठिकाणी घाेडेस्वारी व उंटस्वारी सुद्धा अाहे. त्यामुळे या ठिकाणाचाही तुम्ही अगदीच विचार करु शकता. 

 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याShootingगोळीबार