शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सात इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 12:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू केली..

ठळक मुद्देयेत्या २0२२ साली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार पक्ष बांधणीबरोबरच पालिकेमध्ये वचक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु

पुणे : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, एकूण सात नगरसेवक-नगरसेविकांनी या पदासाठी दावा केला आहे. यामध्ये चार नगरसेविकांचा समावेश आहे. राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवार अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री झाले. २0१७पूर्वी पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. ही सत्ता भाजपने खेचून घेतल्यावर राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले. पालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याच्यादृष्टीने तसेच सत्ताधारी भाजपला रोखण्याकरिता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन लक्ष घातले जाऊ लागले आहे. नुकतीच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिकेत बैठक घेऊन याची प्रचिती दिली आहे. येत्या २0२२ साली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणीबरोबरच पालिकेमध्ये वचक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यावर या पदावर वर्णी लावून घेण्याकरिता इच्छूकांकडून  ‘लॉबिंग’ सुरु करण्यात आले आहे. या पदाकरिता खडकवासला विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सचिन दोडके इच्छुक असून याबाबत त्यांनी पवार यांची भेट घेतली आहे. यासोबतच नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे यांंनीही इच्छा दर्शविली आहे. यासोबतच माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, वैशाली बनकर, दीपाली धुमाळ या इच्छुक आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात ठेवून राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते पदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. ..........पालिकेच्या विरोधी पक्षनेते बदलासोबतच शहराध्यक्ष पदामध्येही बदल केला जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष चेतन तुपे हे आमदार झाले असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली. शहराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, प्रसन्न जगताप, नितीन कदम, प्रदीप देशमुख आदी इच्छुक आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार