शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 9:17 PM

केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील..

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ

पुणे:  पदवी मिळाल्यानंतर पुढे काय? असा विचार न करता,विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११६ वा पदवीप्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.या कार्यक्रमाला हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कंग ,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. या प्रसंगी आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील काजल पंडित महाजन या विद्यार्थीनीला शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासेतर उपक्रम, सामाजिक कार्य, खेळ व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय सहभागासाठी ‘दी प्रेसिडेंट आॅफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक ’ प्रदान करण्यात आले.  भगतसिंह कोश्यारी म्हणाले, देशात नोक-या नाहीत असे मानणे चूकीचे आहे. आपण जगातून अनेक गोष्टी आयात करतो.त्यामुळे देशातील श्रमशक्तीचा आपण व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. मन्युष्यबळाचा व बुध्दीचा योग्य उपयोग केला तर आपण काहीही करू शकतो. गगनदीप कंग म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी बदलत्या भारतात यशस्वी होण्यासाठी  शूर बनावे, उत्तरदायी बनावे आणि अकस्मिक योजना तयार ठेवावी. समाज आपल्याकडून यशाची अपेक्षा करतो आहे. नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. तुम्ही अपयशामुळे खचून गेलात तर संभाव्य संधींपासून वंचित राहाल. धैर्य आणि धोका पत्करणा-या व्यक्तिंसाठी लोक जे.के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात.परंतु,क्रांतिज्योती सावित्रीबाईं फुले यांचेही कार्य मोठे आहे. समाज शिक्षणासाठी सातत्याने घेतलेल्या कष्टामुळे त्या समाजात परिवर्तन घडवू शकल्या.यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांचा आढावा मांडला.पदवी प्रदान समारंभात एक लाख 9 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.,पदव्युत्तर पदवी व पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.---------------------------जीवन जगताना प्रत्येक मार्गात धोके आणि संकटे असतातच.त्यामुळे भविष्यातील संकटे समजून घेऊन त्यातून मार्गही शोधायला हवा. या सर्वांच्या जोडीनेच आपण भविष्यासाठी तयार रहायला हवे, त्यासाठी अकस्मिक योजनाही तयार ठेवायला हव्यात,असेही गगनदीप कंग म्हणाल्या.-------------------विद्यापीठातील सुवर्णपद विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळू शकले नाही. त्यामुळे काही विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र, स्वत: राज्यपाल यांनी सर्व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यभवन येथे चहापानासाठी निमंत्रित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले.------------ कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका अंतर्गत उत्कृष्ठ विद्यार्थिनींसाठी दिले जाणारे निलिमाताई पवार सुवर्णपदक  सुप्रिया गोडसे व हर्षदा बारवकर यांना देण्यात आले.त्याचप्रमाणे माजी कुलपती पी.सी. अलेक्झांडर आंतरविद्यापीठिय मराठी वक्तृत्व स्पर्धेतील विजेता स्नेहल अमृतकर हिला प्रथम क्रमांकांचे तर सारांश सोनार आणि पूजा काटकर यांना विभागून द्वितीय क्रमांकाचे पारितिषिक देण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीuniversityविद्यापीठ