शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

इनोव्हेशनसाठी १० केंद्रे उभारणार; सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा बृहत आराखडा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:53 IST

आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या बृहत आराखड्याला विद्यापीठाकडून गुरुवारी मंजुरी देण्यात आली. हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. यात अनेक बाबींचा समावेश असून, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हबची १० केंदे्र स्थापन करण्यात येणार आहेत.विद्यापीठाच्या गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत आराखड्यात मंजुरी देण्यात आली. विस्तार, समावेशकता, कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती, नवनिर्मिती, उद्योजकता विकास, समाजोपयोगी-उद्योगोपयोगी संशोधन, गुणवत्ता हे निकष डोळ्यासमोर धरून आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, उद्योग-व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते याची मते गृहित धरण्यात आली आहेत. विविध सदस्यांच्या सुचनांनुसार त्यात आवश्यक ते बदलही करण्यात आले आहेत, असी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार आराखड्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एनआरआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठ पाचव्या स्थानावर नेणे, विद्यापीठाचा ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो ३५ टक्क्यांवर नेणे, २०२४ सालापर्यंत विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांत लावणे, कमवा व शिका या योजनेचा लाभ ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, कौशल्य विकास अभ्यासक्रमांची संख्या १०० पर्यंत वाढविणे, सर्वच विद्याशाखांच्या एकूण अभ्यासक्रमांपैकी निम्म्याहून अधिक अभ्यासक्रमांना इंटर्नशीप सक्तीची करणे, प्लेसमेंट सेलची सध्या ४३९ वरून ८५० करणे, समुपदेशन व मार्गदर्शन केंद्रांची संख्या सध्या ४०० वरून ८०० करणे, खेळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देणे, अशा विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत.दिव्यांग व विशेष मुलांसाठी महाविद्यालयपाच वर्षांत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण ५८ नवी महाविद्यालये सुरू केली जातील. त्यामध्ये एका दिव्यांग व विशेष मुलांसाठीच्या महाविद्यालयाचाही समावेश असणार आहे. नवीन महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्यबरोबरच अ‍ॅनिमेशन, एव्हिएशन, फॅशन डिझाईन, फाईन आर्ट्स, सोशल वर्क या विषयांचा समावेश असेल. तसेच महिलांसाठी, आदिवासी भागासाठी तसेच, रात्रीच्या वेळीचे (नाईट कॉलेज) असे प्रत्येकी एकेक महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठEducationशिक्षण