शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईतास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 21:37 IST

तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अटक करण्यात बारामतीच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. हा आरोपी पोलीस असल्याची बतावणी करीत असे ..

ठळक मुद्देबारामती , नगर जिल्ह्यातील गंभीर गुन्हे उघडकीस

बारामती : तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अटक करण्यात बारामतीच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. हा आरोपी पोलीस असल्याची बतावणी करीत असे. त्यातून निर्जन ठिकाणी नेऊन लुट करण्याची त्याची पध्दत होती. त्याच्यावर बारामती येथील जबरी चोरीचे ३, नगर जिल्ह्यातील जबरी चोरीचे २ व जबरी चोरीसह लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय ४६, रा. बेनवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे याप्रकरणातील अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. त्याने सहा गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड, भूम, परांडा, माढा, कोतवाली पोलीस ठाण्यात नगर, पुणे याठिकाणी दुचाकी चोरीचे ४५ गुन्हे दाखल आहेत. दि. २६ मे २०१८ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला बसमधून खाली उतरून घरी निघाली होती. यावेळी पाठीमागून एक दुचाकीवरील अज्ञात आरोपीने त्या महिलेला हाताने मारहाण करून ३० हजारांचे मनी मंगळसूत्र, ३० सोन्याचे मनी, दोन पायातील पैंजण असा एकुण ४६ हजार ५०० रूपये किमंतीचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात दि. २६ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी बारा ते सव्वा एकच्या सुमारास सुर्यनगरी येथील पाटील प्लाझा पोलीस असल्याची बतावणी करीत मारहाण करून मोबाईल व रोकड असा एकूण ७ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला होता. तर तिसऱ्या गुन्ह्यात एका महिलेला बारामती ब स्थानकाजवळ  ‘तुम्ही गुन्हा केला आहे, तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे, असे सांगून माळावरची देवी येथे नेत मोबाईल व दागिने असा २३ हजार ३६० रूपयांचा ऐवज हिसकावण्यात आला होता. अशाप्रकारचे गुन्हे या आरोपीने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देखील केले आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक चंद्रशेखर यादव व पथकाने रेकॉर्डवरील ८० आरोपी तपासले. गुन्हा घडल्यानंतर वेळोवेळी नाकाबंदी करण्यात आली होती. गुन्ह्यातील आरोपींनी ज्या मार्गाचा वापर केला आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची छबी कैद झाली होती. त्याचे नाव निष्पन्न करणे अवघड होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा पेहराव व तांत्रिक माहिती वरून विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेतला.नुकतेच (दि ११) सप्टेंबर रोजी गायकवाडला ताब्यात घेऊन गजाआड केले. ही कारवाई अतिरीक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक चंद्रशेखर यावद, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, पोलीस नाईक संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, रॉकी देवकाते यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसBaramatiबारामतीPuneपुणे