शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

By नितीन चौधरी | Updated: May 8, 2025 19:40 IST

ही पाणीपट्टी वसूल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

पुणे : राज्यातील महापालिका, नगरपालिका तसेच नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक वसाहती, टाऊनशीप यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी थकीत आहे. महामंडळाचे सुमारे २ हजार २०० कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. ही पाणीपट्टी वसूल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ८) पुण्यातील सिंचन भवन येथे नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता (प्रकल्प ) हणुमंत धुमाळ उपस्थित होते.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे महापालिकेकडे सुमारे साडेसातशे कोटी म्हणून अधिक पाणीपट्टीची थकबाकी असल्याने पाणीपट्टी न भरल्यास पाणी तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतर महापालिकेने २०० कोटी रुपयांची थकबाकी जमा केली होती. या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी पाणीपट्टी वसूल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्या सिंचनाचे पाणी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहे. त्यामधून वापरलेल्या ८० टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणे या संस्थांची जबाबदारी आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. नदीच्या खालच्या पात्रात देखील सिंचन आहे. अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे तसेच या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक पाण्याच्या आऊटलेटला मीटर बसविला पाहिजे.या बैठकीत बारामती पंचायत समितीला महामंडळाची जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाकडे कोट्यवधीची जागा मोकळी आहे. मात्र, यापुढे जागा देताना रेडिरेकरनरच्या दरानुसार रक्कम आकारण्यात येईल असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. धरणांच्या हद्दीत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. विशेषत: रिसॉर्टस आणि घरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे शिवाय यामुळे माशांची संख्यादेखील कमी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. अशा सूचना यावेळी विखे-पाटील यांनी दिल्या. धरणातील पाणी स्वच्छ ठेवणे ही जलसंपदाची जबाबदारी आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलWaterपाणी